कलर्सवरील सुपरहिट रिअॅलिटी शो 'बिग बॉस' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बिग बॉस १८'ची घोषणा झाल्यानंतर चाहत्यांमध्ये नव्या सीझनची उत्सुकता निर्माण झाली आहे. काही दिवसांपासूनत्यांच्या अधीकृत सोशल मीडिया आकांऊटवर अनेक व्हिडिओ प्रदर्शित होत आहेत. 'बिग बॉस १८'चे सुत्रसंचालन बॉलिवूडचा भाईजान सलमान खान करणार आहे. या सिझनमध्ये काही तरी वेगळ पाहायला मिळणार अशी माहिती सलमान खानकडून देण्यात आली होती.
कलर्सवरील 'बिग बॉस १८' ला १८ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिझनमधील सदस्यांची यादी समोर आली होती. मात्र त्याबाबत बिग बॉसच्या मेकर्सकडून कोणत्याही प्रकारची अधीकृत माहिती अद्यापही दिली नाही. जवळपास वर्षभरानंतर सलमान खानचे सुत्रसंचालन पाहाण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
चाहत्यांमध्या 'बिग बॉस १८'ची क्रेझ पाहुन अनेक निर्मात्यांनी त्यांचा रिअॅलिटी शो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन महिन्यांपूर्वी अभिनेता रितेश देशमुखचा बिग बॉस मराठीच्या ५व्या सीझनला सुरुवात झाली होती. रितेश देशमुख पहिल्यांदाच हा शो होस्ट करत होता. बिग बॉस मराठीच्या ५व्या सीझनला पूर्वीच्या सर्व सिझनपेक्षा जास्त प्रमाणात TRP मिळाली आहे. प्रेक्षकांकडून बिग बॉस मराठीच्या ५व्या सीझनचं भरपूर कौतुक पाहायला मिळत आहे. परंतु यंदाच्या बिग बॉस मराठीमध्ये एक नवा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. TRP रेटिंग्समध्ये बिग बॉस मराठीच्या या सीझनने अनुपमा या मालिकेला देखील मागे टाकले आहे. बिग बॉस मराठीचा ५वा सिझन १०० दिवसांचा नसून ७० दिवसांचा आहे. रिपोर्टनुसार, बिग बॉस १८ ला TRP रेटिंग्समध्ये अनुपमा या मालिकपसून धोका नसून तर बिग बॉस मराठीकडून आहे. या भितीपोटी बिग बॉस मराठीचा ५वा सिझन बंद करण्यात येत आहे.
खरंतर बिग बॉस मराठी आणि बिग बॉस हिंदी यांच्या TRP मध्ये क्लॅश नाही झाला पाहिजेल यामुळे रितेश देशमुख यांचा बिग बॉस मराठी बंद करण्यात आला अशी मान्यता आहे. बिग बॉसमध्ये यंदा शहजादा धामी आणि नायरा बॉनर्जी यांच्या सोबत पांडे, ऐनाश मिश्रा, ईशा कोपीकर, धीरज कपूर, निया शर्मा, कनिका मान, शोएब इब्राहिम, श्रीराम चंद्रा, दिग्विजय राठी, कशिश कपूर, झान खान, सोनल वेंगुर्लेकर, मॅक्सविकार्ट, दिग्विजय राठी या सदस्यांचा समावेश होणार अशी चर्चा सुरु आहे.
Edited By: Nirmiti Rasal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.