Bigg Boss Marathi Finale Task: 'या' ७ स्पर्धकांमध्ये रंगला अनोखा टास्क; कोण जाणार फायनलला?

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात आता शेवटच्या टप्प्यात सात स्पर्धक आहेत या स्पर्धकांमध्ये आता कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Bigg Boss Marathi Finale Task
Bigg Boss Marathi Finale TaskSaam Tv
Published On

बिग बॉस मराठी सीझन 5 चा शेवटचा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात आता आठ सदस्य बाकी राहिले आहेत. अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर, धनंजय पोवार हे आठही सदस्य या आठवड्यात नॉमिनेट आहेत. त्यामुळे या आठ सदस्यांमध्ये कोण जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Bigg Boss Marathi Finale Task
Bigg Boss Marathi: अभिजीतच्या 'त्या' निर्णयावर जान्हवी संतापली, रडत रडत म्हणाली, या घरातली माझी किंमत...

बिग बॉस मराठी सीझन 5च्या संपायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. १०० दिवसांचा हा प्रवास आता ७० दिवसांचा असणार आहे. येत्या ६ ऑक्टोबरला बिग बॉस मराठी सीझन 5 ग्रँड फिनाले आहे. अशातच बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये नवा टास्क रंगणार आहे. बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झालाय.

बिग बॉसच्या घरात तिकीट टू फिनाले टास्क पार पडला. या टास्कसाठी घरामध्ये स्पर्धकांसाठी बाबागाडीचा प्रवास सुरू झाला. बिग बॉसच्या घरातीस सात स्पर्धकामध्ये हा टास्क रंगला दरम्यान बाबागाडीवरून स्पर्धकांना घरभर फिरून झेंडे गोळा करायचे आहेत कमी वेळेत जास्तीत जास्त झेंडे गोळा करणाऱ्या सदस्याला तिकीट टू फिनालेचा टास्क खेळता येणार असल्याचे सांगितले होते.

Bigg Boss Marathi Finale Task
Mc Stan Missing News: प्रसिद्ध रॅपर 'एमसी स्टॅन' झालाय गायब? मुंबईसह 'या' ठिकाणी लागले पोस्टर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com