'बिग बॉस 18'चा (Bigg Boss 18) ग्रँड फिनाले 19 जानेवारीला पार पडला. 'बिग बॉस 18'चा विजेता कोण होणार, हा जाणून घेण्यासाठी चाहते खूप आतुर होते. अखेर करण वीर मेहरा विवियन डिसेनाला मात देत 'बिग बॉस 18'चा विजेता ठरला. त्याने बिग बॉसची ट्रॉफी उचलली. यंदाच्या सीझनला बिग बॉसच्या घरात खूप तगडे कलाकार पाहायला मिळाले. विवियन डिसेना आणि करण वीर मेहराने तर संपूर्ण सीझन राडा घातला.
'बिग बॉस 18'मध्ये शेवटी सहा सदस्य फिनालेला गेले. यात करण वीर मेहरा, विवियन डिसेना, रजत दलाल, अविनाश मिश्रा, ईशा सिंह आणि चुम दरांग (Chum Darang) होती. चुम दरांगने आपल्या क्यूट व्यक्तिमत्त्वाने घरातील सदस्यांसोबतच प्रेक्षकांची देखील मने जिंकली. बिग बॉसच्या घरात चुम दरांग आणि करण वीर मेहरा यांची छान मैत्री पाहायला मिळाली. सध्या सोशल मीडियावर चुम दरांगचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
चुम दरांग ही अरुणाचल प्रदेशत राहणारी मुलगी आहे. या मुलीने चक्क मराठीत संवाद साधला आहे. चुम दरांगच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये चुम मराठी भाषेत बोलताना पाहायला मिळत आहे. नुकतेच चुम दरांगला स्पॉट करण्यात आले. तेव्हा पापाराझींनी तिला विचारले की, "कशी आहेस?" तेव्हा उत्तर देत चुम म्हणाली, "खूप छान..." चुम दरांगच्या या संवादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
करण वीर मेहराच्या विजयाचा चुम दरांगला खूप आनंद झाला. करण वीरला विजेता घोषित केल्यावर चुम दरांग आनंदाने उड्या मारू लागली होती. तिने शिल्पा शिरोडकरला मिठी देखील मारली. बिग बॉसचे चाहते आता नव्या सीझनची वाट पाहत आहे. तर चुम दरांगचे चाहते तिला आगामी प्रोजक्टमध्ये पाहण्यास उत्सुक आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.