Subodh Bhave : पडद्या मागच्या कथा उलगडणार, 'बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे सीझन ३'ची घोषणा

Big Marathi Bioscope Season 3 : बिग एफएमकडून 'बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे सीझन ३'ची घोषणा करण्यात आली आहे. या शोमधून चित्रपटांच्या पडद्या मागच्या कथा उलगडणार आहेत.
Big Marathi Bioscope Season 3
Subodh BhaveSAAM TV
Published On

नितीन पाटणकर,साम टिव्ही प्रतिनिधी

आपल्या अभिनयाने मनोरंजनसृष्टी गाजवणारा अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) कायमच आपल्या उत्तम कलाकृतीसाठी ओळखला जातो. आजवरच्या प्रवासात सुबोध भावे यांनी अनेक हिट चित्रपट, मालिका आणि नाटक केली आहेत. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. कोणतीही भूमिका असू दे ते उत्तम पद्धतीने ती साकारतात. त्याचा अभिनय मनात घर करून राहतो. आता अभिनेता सुबोध भावे पडद्या मागच्या कथा उलगडायला येणार आहे.

बिग एफएमकडून 'बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे सीझन ३'ची (Big Marathi Bioscope with Subodh Bhave Season 3) घोषणा करण्यात आली आहे. या शोमध्ये मराठी चित्रपटांच्या आणि नाटकांच्या पडद्या मागच्या कहाण्या उलगडणार आहे. बिग एफएमकडून पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नवीन सीझनची घोषणा करण्यात आली. या घोषणेमुळे चाहते खूपच आनंदात आहे. आघाडीच्या रेडिओ नेटवर्कमध्ये 'बिग एफएम'चे नाव येते.

'बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे सीझन ३'चा धमाकेदार प्रिमियर २७ जानेवारी रोजी बिग एफएमवर प्रसारीत होईल. 'सीझन ३'ची संकल्पना 'जोडी स्पेशल' अशी आहे. पडद्यावरील प्रसिद्ध जोड्या जसे की, गायक- संगीतकार, दिग्दर्शक- अभिनेता या सारख्या जोड्यांचा यात समावेश असेल. यातील काही प्रतिष्ठित जोड्यांचा गौरव देखील 'सीझन ३' मध्ये करण्यात येणार आहे. 'बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे सीझन ३' पुण्यातील श्रोत्यांना बिग एफएमवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत आणि रविवारी सकाळी 7 ते 10 या वेळेत ऐकता येईल.

बिग एफएम कायमच मराठी चित्रपट उद्योगाचा वारसा जपते. बहुप्रतीक्षित 'बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे सीझन ३'ऐकण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मराठी चित्रपट उद्योगाचा वारसा साजरा करत आपला शो बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे घेऊन येत आहे. या शोमुळे श्रोत्यांचे मराठी सिनेमाशी असलेले नाते अधिक बळकट होईल. अलिकडेच मराठमोळा अभिनेता सुबोध भावे 'मानापमान' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातील त्याचा अभिनय चाहत्यांना खूपच आवडला.

Big Marathi Bioscope Season 3
Shivani-Ambar : अखेर राजा राणी अडकले लग्नबंधनात; शिवानी झाली गणपुळेंची सून, पाहा PHOTOS

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com