Pushpa 3 : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाच्या दुसऱ्या भागाने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम मोडले आहेत आणि प्रेक्षकांना वेड लावले आहे. चित्रपटाच्या शेवटी त्याच्या तिसऱ्या भागाची एक झलक दाखवण्यात आली होती. चित्रपटात श्रीवल्लीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिनेही चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित होऊ शकतो असे सांगितले होते. पुष्पाराजचे चाहते पुष्पाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता पुष्पाच्या टीमशी संबंधित आणखी एका व्यक्तीनेही एक मोठी अपडेट दिली आहे.
अल्लू अर्जुनच्या पुष्पाची जादू सर्वांच्या मनावर राज्य करत आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात लोकांचे खूप मनोरंजन झाले आणि आता चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची चर्चा रंगली आहे. पुष्पा 2 चा शेवट पाहून चाहत्यांना तिसऱ्या भागाची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, चित्रपटाचे संगीतकार देवी श्री प्रसाद यांनी पुष्पा ३ बद्दलची महत्वाची बातमी सांगितली आहे.
'कथेवर सतत काम सुरू आहे'
पुष्पाचे संगीतकार देवी श्री प्रसाद एका मुलाखतीत म्हणाले की, चित्रपट दिग्दर्शक सुकुमार पुष्पा ३ च्या कथेवर काम करत आहेत. पुष्पाच्या दोन्ही भागांच्या यशाबद्दल त्यांनी संपूर्ण टीमचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम हे सर्वांच्या मेहनतीचे यश आहे. त्यांनी दिग्दर्शक सुकुमार आणि अल्लू अर्जुनचे कौतुक केले.
'आम्हाला जगभरातून प्रेम मिळाले'
देवी श्री प्रसाद पुढे म्हणाले की, आम्हाला संपूर्ण जगभरातून प्रेम मिळाले. आम्हाला फक्त तेलुगू भाषेतूनच नाही तर हिंदी, तमिळ, मल्याळम आणि अगदी नेपाळ आणि परदेशातूनही खूप प्रेम मिळाले. पुष्पा ३ बद्दलच्या प्रश्नावर देवी म्हणाले, आम्ही पहिल्या दोन भागांप्रमाणेच पुष्पा ३ साठीही आमचे सर्वस्व देऊ. देवी म्हणाल्या की, पुष्पा ३ चे शूटिंग अद्याप अधिकृतपणे सुरू झालेले नाही, तथापि, पुष्पा १ च्या काळापासून आमच्याकडे बरेच कल्पना आहेत. पुष्पा २ मध्ये काही संगीत प्रकार यपजि वाटत नव्हते पण कदाचित भाग ३ मध्ये हे संगीत प्रकार प्रेक्षकांना आवडतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.