Saif Ali Khan : जीव वाचवणाऱ्या रिक्षा चालकाची सैफनं घेतली भेट, खांद्यावर हात ठेवत म्हणाला...

Saif Met Auto Driver : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याला वाचवणाऱ्या रिक्षा चालकाची भेट घेतली आहे. सैफ आणि रिक्षा चालकामध्ये काय संवाद झाला जाणून घ्या.
Saif Met Auto Driver
Saif Ali KhanSAAM TV
Published On

सैफ अली खानच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होताना पाहायला मिळत आहे. सैफला मंगळवारी (21 जानेवारी)ला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सैफ त्याचा जीव वाचवणाऱ्या रिक्षा चालकाची भेट घेतल्याचा एक फोटो समोर आला आहे.

सध्या सोशल मीडियावर सैफ अली खान आणि रिक्षा चालकाची भेटचा फोटो व्हायरल होत आहे. सैफ अली खान मंगळवारी हॉस्पिटलमध्येच रिक्षा चालकाला भेटला होता. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये सैफ पांढरा शर्ट आणि डेनिम जीन्स घातली आहे आणि सनग्लासेस लावला आहे. तर रिक्षा चालकाने निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. फोटोमध्ये सैफ रिक्षा चालकाच्या खांद्यावर हात ठेवून बसलेला पाहायला मिळत आहे.

सैफ आणि रिक्षा चालकाच्या भेटीमध्ये त्यांच्यात संवाद घडतो. सैफ अली खान आपले जीव वाचवल्याबद्दल रिक्षा चालकाचे आभार मानतो. तेव्हा सैफची आई शर्मिला टागोरही रिक्षा चालकाचे आभार मानते. तसेच नेहमी इतरांना मदत करण्याचे प्रोत्साहन दिले. सैफ अली खानने रिक्षाचालकाच्या कामाचे कौतुक केले. "अशीच सर्वांना मदत करत राहा" असे सैफ म्हणाला. पुढे सैफ म्हणाला की, त्या दिवशीचे भाडे तुम्हाला दिले जाई. यावर रिक्षा चालक हसत म्हणाला, "आयुष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर माझी आठवण नक्की काढा."

Saif Met Auto Driver
Saif Ali Khan: सैफ अली खानचा हल्ल्याच्या घटनेनंतर मोठा निर्णय, लवकरच...

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर 16 तारखेला रात्री हल्ला करण्यात आला. त्याच्या घरी चोर शिरला होता. चोरासोबत झालेल्या झटापटीत सैफ अली खान खूप जखमी झाला. चोराने त्याच्यावर चाकूने वार केले. तेव्हा रक्तबंबाळ अवस्थेत भजनसिंग राणा या रिक्षा चालकाने सैफला हॉस्पिटलमध्ये आणले होते. रिक्षा चालक सैफला लीलावती हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. सैफचा जीव वाचवणाऱ्या रिक्षा चालकाने सैफकडून कोणतेही पैसे घेतले नाही.

Saif Met Auto Driver
Saif Ali Khan: सैफ अली खानवर आणखी एक संकट, १५ हजार कोटींची संपत्ती जप्त होणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com