Saif Ali Khan: सैफ अली खानचा हल्ल्याच्या घटनेनंतर मोठा निर्णय, लवकरच...

Saif Ali Khan Discharge from hospital: अभिनेता सैफ अली खानला आज रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. सैफ आणि त्याचे कुटुंबाला एकटे सोडण्याची मागणी करीनाने केली आहे.
Saif Ali Khan Discharge
Saif Ali KhanSAAM TV
Published On

Saif Ali Khan: बॉलिवूडचा अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांनी त्यांच्या तैमूर आणि जेह मुलांसह यांच्यासह वांद्रे येथील त्यांच्या जुन्या निवासस्थानी परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. वृत्तानुसार, सैफला अलिकडेच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, कारण कुटुंबला सध्या सुरक्षित वातावरणची गरज आहे.

सैफ अली त्याच्या कुटुंबासह दुसऱ्या घरात शिफ्ट होणार असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तैमूर आणि जेहचे सामान रात्रीच्या वेळी सद्गुरु शरण अपार्टमेंटमधून फॉर्च्यून हाइट्समध्ये नेण्यात आले आहे. तथापि, सैफ अली खान, करीना किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी याची बातमीची पुष्टी केलेली नाही. सैफ अलीचा आलिशान अपार्टमेंट फॉर्च्यून हाइट्स मुंबईतील टर्नर रोडवर आहे. पूर्वी सैफ आणि करीना त्यांच्या कुटुंबासह येथेच राहत होते.

Saif Ali Khan Discharge
Sikandar: 'बाप है ये सबका...'; 'सिकंदर'च्या सेटवरून सलमान खानचा व्हिडीओ लीक!

सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत पोलिस सतर्क आहेत आणि तपासात गुंतले आहेत. दरम्यान, दररोज नवीन खुलासे होत आहेत. घटनेच्या वेळी आरोपी शहजादने घातलेले कपडे आणि इअरफोन पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफचा धाकटा मुलगा जहांगीरच्या खोलीच्या बाथरूमच्या खिडकीचे ग्रिल तुटलेले आढळले. आरोपीने तेथून घरात प्रवेश केला आणि गुन्हा केला.

Saif Ali Khan Discharge
Eisha Singh: बिग बॉसच्या घराबाहेर येताच ईशाने केला मोठा खुलासा; म्हणाली, 'आधीपासूनच...'

आरोपी शहजादने १२ वी पर्यंत शिक्षण घेतले आहे आणि तो बांगलादेशमधील राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू देखील आहे. आरोपीने पोलिसांना सांगितले की तो बांगलादेशात कुस्तीपटू आहे. त्याने जिल्हा तसेच राष्ट्रीय पातळीवर कुस्ती खेळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com