Sikandar: 'बाप है ये सबका...'; 'सिकंदर'च्या सेटवरून सलमान खानचा व्हिडीओ लीक!

Sikandar Movie : सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, सलमान खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ 'सिकंदर'च्या सेटवरील असल्याचे म्हटले जात आहेत.
Sikandar
SikandarGoogle
Published On

Sikandar: सलमान खानच्या 'सिकंदर'चित्रपटाबद्दल बरीच चर्चा होत आहे. हा चित्रपट ईदला प्रदर्शित होणार आहे, या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून ते लवकरच पूर्ण होईल. निर्मात्यांना हा चित्रपट वेळेवर पूर्ण करायचं आहे, म्हणून पोस्ट प्रोडक्शनचं कामही शूटिंग सोबत एकाच वेळी सुरू आहे. दरम्यान, सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो सिकंदरच्या सेटवरून लीक झालेला व्हिडीओ असल्याचे म्हटले जात आहे. यात किती तथ्य आहे ते जाणून घेऊयात.

एक्स वर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये अनेक टॅक्सी येतात आणि सलमान खान पहिल्या टॅक्सीतून खाली उतरताना दिसतो. ४६ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये, सलमान खान टॅक्सीतून बाहेर येताच, त्याच्या मागे अनेक लोक चालताना दिसत आहेत. हा सिकंदरचा लीक झालेला व्हिडीओ आहे का? असा प्रश्न चाहते करत आहेत.

Sikandar
Rashmika Mandanna: 'स्वराज्याची शान महाराणी येसूबाई'; रश्मिकाचा 'छावा' चित्रपटातील नवा लूक पाहिलात का ?

सलमान खानचा हा व्हिडीओ ज्या ठिकाणाहून व्हायरल झाला आहे. तो एक ग्रामीण भाग असल्याचे दिसत आहे. पण हा व्हिडीओ सिकंदर चित्रपटाच्या चित्रीकरणाचा असल्याची पुष्टी झाली आहे. कारण आजूबाजूला लोकांची गर्दी जमलेली आहे. सगळे त्यांच्याकडे पाहत आहेत. तिथे मुले वाहनांमागे धावताना दिसतात जेणेकरून दृश्य खरे वाटेल. सलमान खान देखील कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. त्याच्या मागे चालणारे हे लोक त्याचे अंगरक्षक आहेत किंवा पोलिस असल्याचे त्यांच्या चालण्यावरून दिसत आहे. सिकंदर नावाच्या एका पेजने हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्याला सिकंदरचा लीक झालेला सीन म्हटले आहे. आता, यात किती तथ्य आहे माहित नाही.

Sikandar
Shahrukh Khan: 'क्रिस मार्टिन फॉरएव्हर अँड एव्हर...'; क्रिस मार्टिनसाठी लिहिलेली शाहरुखची 'ती' पोस्ट व्हायरल

सलमान खानचे चित्रपट?

'सिकंदर' व्यतिरिक्त सलमान खानचे नाव इतर अनेक चित्रपटांशीही जोडले जात आहे. तो अ‍ॅटलीसोबत एक चित्रपटही करणार आहे. सध्या त्याचे कास्टिंग सुरू आहे. लवकरच या चित्रपटाची देखील घोषणा करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com