Shahrukh Khan: 'क्रिस मार्टिन फॉरएव्हर अँड एव्हर...'; क्रिस मार्टिनसाठी लिहिलेली शाहरुखची 'ती' पोस्ट व्हायरल

Shahrukh Khan: कोल्डप्ले कॉन्सर्टच्या भारतात खूप चर्चेत आहे. मुंबईत झालेल्या अलीकडील कॉन्सर्टचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या शोमध्ये त्याने बॉलिवूडचा बादशाह किंग खानचाही उल्लेख केला होता.
Coldplay and shahrukh khan
Coldplay and shahrukh khanGoogle
Published On

Shahrukh Khan: शाहरुख खानला कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्यांनी त्यांच्या कामामुळे देशात आणि जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. शाहरुख कुठेही गेला तरी त्याचे चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना कधीच थकत नाहीत. गेल्या वर्षी, दुआ लिपाने तिच्या कॉन्सर्टमध्ये किंग खानचे प्रतिष्ठित गाणे वाजवून त्याला त्याचा सन्मान केला. हाच प्रकार पुन्हा एकदा कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमध्ये दिसला.

या खचाखच भरलेल्या कॉन्सर्टमध्ये जेव्हा क्रिस मार्टिनने शाहरुखचे नाव घेतले तेव्हा प्रेक्षक वेडे झाले. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही येत आहेत. आता शाहरुख खाननेही हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

Coldplay and shahrukh khan
Fussclass Dabhade: आधी हळद, मग लग्न, आता गोंधळ; 'फसक्लास दाभाडे' मधील ‘तोड साखळी’ गाणं प्रदर्शित…

व्हायरल व्हिडिओवर शाहरुख खान काय म्हणाला?

शाहरुख खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हायरल व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले, 'ताऱ्यांकडे पहा... ते तुमच्यासाठी कसे चमकतात ते पहा... आणि तुम्ही जे काही करता ते सर्व.' माझा भाऊ क्रिस मार्टिन, तुझ्या गाण्यांप्रमाणेच तू मलाही खास बनवलेस. तुला खूप प्रेम. तसेच व्हिडिओवर कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'क्रिस मार्टिन फॉरएव्हर अँड एव्हर.' कोल्डप्लेचा दुसरा शो १९ जानेवारी रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये क्रिस मार्टिनच्या कॉन्सर्टमध्ये मोठ्या संख्येने लोक जमले होते.

Coldplay and shahrukh khan
Bigg Boss 18 Final: सलमान खानमुळे अक्षयने शूटिंग केली रद्द; बिग बॉस १८ च्या सेटवर आला, पण 'या' कारणाने माघारी परतला!

क्रिस मार्टिन शाहरुख खानचा चाहता

हा कार्यक्रम मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये झाला. आपला परफॉर्मन्स सुरू करण्यापूर्वी, क्रिस मार्टिन म्हणाला, 'शाहरुख खान फॉरेव्हर.' हे ऐकून प्रेक्षक आनंदाने मोठ्याने ओरडू लागले. क्रिसने शाहरुखचे नाव घेऊन केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत तर त्याच्या शोमध्ये हिंदीमध्ये स्पीचही दिले. तो हिंदीत म्हणाला, 'तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे.' आम्हाला मुंबईत येऊन खूप आनंद होत आहे. एवढेच नाही तर त्याने सर्वांसमोर “जय श्री राम” असे म्हटले, जे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com