Bigg Boss 18 Final: सलमान खानमुळे अक्षयने शूटिंग केली रद्द; बिग बॉस १८ च्या सेटवर आला, पण 'या' कारणाने माघारी परतला!

Bigg Boss 18 Final: काल रिअॅलिटी शो बिग बॉस १८ चा ग्रँड फिनाले संपला आणि करणवीर मेहरा विजेता ठरला. पण काल अभिनेता अक्षय कुमार बिग बॉस १८ च्या सेटवरून शूटिंग न करताच परतल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत.
Akshay kumar and salman khan
Akshay kumar and salman khanGoogle
Published On

Bigg Boss 18 Final: बिग बॉस १८ चा ग्रँड फिनाले काल म्हणजेच १९ जानेवारी रोजी संपला. या सीझनमध्ये करणवीर मेहरा विजेता ठरला, तर विवियन डिसेना हा पहिला रनरअप ठरला. बिग बॉस १८ च्या अंतिम फेरीत सलमान खानसोबत आमिर खानसारखे अनेक चित्रपट कलाकारही उपस्थित होते.दरम्यान, या फिनाले शूटसाठी अक्षय कुमार देखील सेटवर पोहोचला, पण असे काय झाले की अक्षय बिग बॉस १८ ग्रँड फिनालेच्या सेटवरून शूटिंग न करताच निघून गेला. अक्षयने सलमान खानचा रिअॅलिटी शो मध्येच सोडण्याचे कारण काय होते ते जाणून घेऊया.

अक्षय कुमारने बिग बॉस १८ साठी शूट का केले नाही?

खरंतर, अक्षय कुमार आणि वीर पहाडिया रविवारी बिग बॉस १८ च्या ग्रँड फिनालेच्या सेटवर त्यांच्या स्काय फोर्स या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेले होते. वेळापत्रकानुसार, अक्षय आणि वीर सेटवर पोहोचले पण बराच वेळ वाट पाहिल्यामुळे, अक्षय वीरला एकटे सोडून निघून गेला. बिग बॉस १८ च्या मंचावर सलमानने स्वतः हे सांगितले होते.

Akshay kumar and salman khan
Kannappa Movie: हातात त्रिशूळ, गळ्यात रुद्राक्ष; अक्षय कुमारचा नवा अवतार बघितला का?

बिग बॉस १८ च्या ग्रँड फिनालेमध्ये अक्षय कुमार सहभागी न होण्याचे कारण सलमानने स्पष्ट केले. एका वृत्तानुसार, अक्षय कुमार वेळेवर सेटवर पोहोचला होता. तो बिग बॉस १८ च्या सेटवर दुपारी २:१५ वाजता पोहोचला, परंतु सलमान खान १ तास उशिरा आला आणि त्यामुळे अक्षय जास्त वाट पाहू शकला नाही. म्हणूंन सलमान खानमुळे अक्षयने बिग बॉस १८ ग्रँड फिनालेच्या सेटवरून निघून गेला.

Akshay kumar and salman khan
Bigg Boss 18 Winner: 'वोटिंगची काय गरज थेट ट्रॉफी देऊ....'; करणवीर मेहरा बिग बॉस १८ जिंकल्याने नेटकरी नाराज

अक्षयला पुढे त्याला जॉली एलएलबी ३ च्या सेटवर पोहोचायचे होते. या चित्रपटात तो अभिनेता अर्शद वारसीसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे अर्धे चित्रीकरण जवळजवळ पूर्ण झाले आहे आणि जॉली एलएलबी ३ या वर्षाच्या मध्यात चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com