Eisha Singh: बिग बॉसच्या घराबाहेर येताच ईशाने केला मोठा खुलासा; म्हणाली, 'आधीपासूनच...'

Bigg Boss 18 : बिग बॉस १८ संपला असला तरी त्याच्या चर्चा अजूनही सुरु आहेत. करण वीर मेहरा या सीझनचा विजेता ठरला. तर, शो संपताच या शोबद्दल अनेक खुलासे ईशा सिंगने केले आहेत.
Eisha singh
Eisha singhGoogle
Published On

Bigg Boss 18 : बिग बॉस १८ संपला असला तरी त्याच्या चर्चा अजूनही सुरु आहेत. करण वीर मेहरा या सीझनचा विजेता ठरला, त्याने केवळ ट्रॉफीच नाही तर ५० लाख रुपयांचे रोख बक्षीसही जिंकले, तर विवियन डिसेना फस्ट रनरअप ठरला. टॉप ६ फायनलिस्टमध्ये ईशा सिंग होती, जी संपूर्ण सीझनमध्ये तिच्या स्पष्ट मतांमुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिली. करण वीर मेहराबद्दलच्या तिच्या नापसंतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ईशाने शो दरम्यान अनेकदा त्याच्यावर टीका केली आहे. दरम्यान, बिग बॉस १८ संपल्यानांतर ईशाने करणवीरचे कौतुक केले आहे.

ईशाने तिच्या पराभवाबद्दल काय म्हटले?

बिग बॉस १८ मधील ईशा सिंगची मुलाखत आता समोर आली आहे, यशाने या शोमधील तिच्या प्रवासाबद्दल आणि तिच्या नातेसंबंधांबद्दल उघडपणे सांगितले. ईशाने विजयी न होऊ शकल्याबद्दल तिची निराशा व्यक्त केली. ती म्हणाली, “मी ट्रॉफी जिंकू शकले नाही याचे मला खूप दुःख आहे पण हे आधीपासूनच माझ्या हातात नव्हतं. पण माझे जे काही आहे ते म्हणजे माझे सुंदर नाते, अविनाश मिश्रा सोबतची मैत्री, विवियन डिसेनाकडून मिळालेले अफाट प्रेम, रजत दलालकडून मिळालेली भरपूर काळजी आणि अ‍ॅलिस कौशिकसोबतची माझी मैत्री.”

Eisha singh
Rashmika Mandanna: 'स्वराज्याची शान महाराणी येसूबाई'; रश्मिकाचा 'छावा' चित्रपटातील नवा लूक पाहिलात का ?

ईशा अविनाश मिश्रा बद्दल बोलते

ईशा म्हणाली, “बिग बॉस १८ च्या घरात मिळालेली मैत्री आणि प्रेम हेच माझे खरे यश आहे. अविनाशचे कितीही कौतुक केले तरी ते पुरेसे ठरणार नाही कारण तो माझ्या दुःखाच्या काळात माझ्यासोबत उभा राहिला. तो मला हसवत असे माझ्या आनंदातही सहभागी होत असे. तो माझ्यासाठी खूप खास आहे.”

Eisha singh
Sikandar: 'बाप है ये सबका...'; 'सिकंदर'च्या सेटवरून सलमान खानचा व्हिडीओ लीक!

रजत दलाल बद्दल बोलताना ईशा म्हणाली, “मी त्याला माझा भाऊ मानते आणि तो माझ्यासाठी खूप जवळचा आहे.चुम दरंग बद्दल बोलताना ईशा पुढे म्हणाली, “ती खूप छान आहे. ती शांत राहते, पण जेव्हाही ती बोलते तेव्हा ती लोकांना खूश करते बोलते.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com