Munawar Faruqui And Ankita Lokhande Saam Tv
मनोरंजन बातम्या

'Bigg Boss 17' चा पहिला कॅप्टन होणं मुनव्वर फारुकीला पडलं महागात, मैत्रीण अंकिता लोखंडेला शिक्षा देण्याचे मिळाले आदेश

Munawar Will Punish Friend Ankita: बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर काही सदस्यांची खूपच घट्ट मैत्री झाली आहे. यातील एक म्हणजे मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande).

Priya More

Bigg Boss 17 New Promo:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त रियालिटी शो 'बिग बॉस १७'ला (Bigg Boss 17) प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. या शोमध्ये सदस्यांची भांडणं, रुसवे-फुगवे, प्रेम प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर काही सदस्यांची खूपच घट्ट मैत्री झाली आहे. यातील एक म्हणजे मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande). या दोघांची मैत्री खूप चांगली असून दोघे नेहमीच एकमेकांशी गप्पा मारताना, जुन्या आठवणी सांगताना दिसतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'बिग बॉस १७'च्या (Bigg Boss 17) घराला तब्बल ९ आठवड्यानंतर पहिला कॅप्टन मिळाला. नुकताच बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन्सी टास्क पार पडला असून मुनव्वर फारुकीला बिग बॉसच्या घरातील पहिला कॅप्टन होण्याचा मान मिळाला. बिग बॉसने घरातील सदस्यांना सरप्राईज दिले आणि घोषणा केली की शोमध्ये प्रथमच कॅप्टन पदाची कामे केली जाणार आहेत. अनेक आठवड्यांनंतर स्पर्धकांना घरातील कामातून सुट्टी घेण्याची संधी मिळाली.

कॉमेडियन मुनव्वर फारुकीला 'बिग बॉस 17 चा पहिला कॅप्टन होण्याचे भाग्य लाभले. या सीझनचा पहिला कॅप्टन म्हणून त्याची निवड करण्यात आली. मात्र आता बिग बॉसने त्याला अडचणीत टाकले आहे. बिग बॉसने मुनावर फारुकीला त्याची खास मैत्रीण अंकिता लोखंडेला शिक्षा करण्याचे आदेश दिले आहेत.

खरंतर अंकिता लोखंडेने घरचा एक नियम मोडला. अभिनेत्रीची तपासणी करण्यासाठी डॉक्टर बिग बॉस 17 च्या घरात आले होते. तपासणीदरम्यान अंकिता लोखंडे यांनी डॉक्टरांकडून बाहेरच्या जगाचे अपडेट्स घेण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने बिग बॉसने अभिनेत्रीला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

बिग बॉसने घराचा नवा कॅप्टन मुनावर फारुकी यांना बोलावून अंकिता लोखंडेची क्लिप दाखवली. ज्यामध्ये ती डॉक्टरांना विचारत होती. बिग बॉसने कॅप्टनला व्हिडिओ पाहायला लावून अंकितासाठी योग्य ती शिक्षा ठरवण्यास सांगितले. आता मुनव्वर तिची खास मैत्रीण अंकिताला काय शिक्षा देतात? हे येत्या एपिसोडमध्ये पहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT