Aditya Roy Kapoor And Ananya Panday
Aditya Roy Kapoor And Ananya PandaySaam Tv

Aditya Roy Kapur: अनन्या पांडेचे नाव ऐकताच आदित्य रॉयच्या चेहऱ्यावर येते स्माइल, 'कॉफी विथ करण'मध्ये सांगितलं सिक्रेट

Aditya Roy Kapoor And Ananya Panday: या शोमध्ये बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अर्जुन कपूर यांनी एकत्र हजेरी लावली. यावेळी दोघांनी देखील आपल्या पर्सनल आणि लव्ह लाइफबद्दल अनेक खुलासे केले.
Published on

Koffee With Karan 8 New Promo:

बॉलिवूड (Bollywood) चित्रपट निर्माता करण जोहरचा टॉक शो 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये बॉलिवूडमधील अनेक स्टार सेलिब्रिटींनी आतापर्यंत हजेरी लावली. या शोला प्रेक्षकांकडून देखील खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशामध्ये आता या शोमध्ये बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांनी एकत्र हजेरी लावली. यावेळी दोघांनी देखील आपल्या पर्सनल आणि लव्ह लाइफबद्दल अनेक खुलासे केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अभिनेता आदित्य रॉय कपूर म्हणाला की,'अनन्या पांडेचे नाव ऐकल्यावर खूप आनंद होतो.' आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा तेव्हा सुरू झाल्या होत्या जेव्हा कॉफी विथ करणमध्ये अनन्या पांडेने स्वत:ला अनन्या कॉय कपूर असे संबोधले होते. तेव्हा या डेटिंगच्या अफवा खऱ्या ठरल्या. आता 'कॉफी विथ करण'मध्ये आदित्य रॉय कपूर आल्यामुळे होस्ट करण जोहरने त्याच्याकडून डेटिंगच्या अफवांबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

करण जोहरने आदित्यला विचारले, 'तू अनन्याला डेट करतोय का?' यावर उत्तर देताना आदित्य म्हणतो की, 'मला कोणतेही सिक्रेट विचारू नका आणि मी तुला काहीही खोटे सांगणार नाही.' करणने पुढे विचारले की, 'पण तिने (अनन्या) सांगितले की ती पूर्णपणे अनन्या 'कॉय' कपूर आहे.' तर आदित्यने उत्तर दिले की,'आणि मी अजूनही आदित्य 'जॉय' कपूर आहे.

या चर्चांदरम्यान, करणने आदित्यला आणखी एक प्रश्न विचारला की,'तुला म्हणायचे आहे की तू या परिस्थितीत आनंदी आहेस.'आदित्यने उत्तर दिले की, 'हो, मी खूप आनंदी आहे.' पुढे करण त्याला म्हणाला की, 'तू खूप आनंदी आहेस, म्हणून जेव्हा मी अनन्या म्हणतो तेव्हा तुझ्या मनात पहिला शब्द येतो तो म्हणजे आनंद.' तर आदित्य पुढे म्हणतो की, 'होय, प्युअर जॉय.'

Aditya Roy Kapoor And Ananya Panday
Welcome 3 Teaser Cost: ‘वेलकम ३’च्या टीझरवर मेकर्सने केला पाण्यासारखा पैसा खर्च, आकडा पाहून तुम्हालाही बसेल दातखिळी

कॉफी विथ करण सीझन 8 डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित होत आहे. आदित्य आणि अर्जुनने या शोमध्ये हजेरी लावल्याचा प्रोमो रिलीज होताच तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आदित्य आणि अर्जुन हे दोन्ही अभिनेते प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे आता त्यांचे चाहते या शोचा हा एपिसोड रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, 'कॉफी विथ करण 8'च्या मागच्या एपिसोडमध्ये विकी कौशल आणि कियारा अडवाणीने हजेरी लावली होती.

Aditya Roy Kapoor And Ananya Panday
Raj Kapoor 51 Rare Things Auction: ‘शो मॅन’च्या जन्मशताब्दी वर्षी होणार ५१ दुर्मिळ गोष्टींचा लिलाव, ‘या’ वस्तूंचा आहे समावेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com