मुंबईमध्ये (Mumbai) दिवसेंदिवस ट्राफिक (Mumbai Traffic) वाढत चालले आहे. वाढत्या ट्राफिकला मुंबईकर कंटाळले आहेत. अनेकदा ट्राफिकमुळे एकाच ठिकाणी बराच वेळ थांबावे लागते. त्यामुळे महत्वाची कामं देखील होत नाहीत. या ट्राफिकचा सामना फक्त सर्वसामान्य मुंबईकरांनाच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटींना देखील करावा लागत आहे.
याचा प्रत्यत आलाय तो म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने ट्राफिकला वैतागून महागड्या कारमधून नाही तर रिक्षातून प्रवास केला आहे. अनन्या पांडेचा (Ananya Panday) हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेहमी आलिशान आणि आरामदायी कारमधून प्रवास करणारे बॉलिवूड स्टार आजकाल सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. नुकताच हृतिक रोशनने मेट्रोतून प्रवास केला होता. आता अनन्या पांडेने रिक्षातून प्रवास केल्यामुळे ती चर्चेत आली आहे. अनन्या पांडे नुकतीच रिक्षातून प्रवास करताना दिली. स्वत: अनन्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला अनन्याच्या चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे.
अनन्या पांडेने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. यामध्ये ती ऑटो रिक्षाने प्रवास करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राउंडमध्ये 'जरा हटके जरा बचके, ये है मुंबई मेरी जान...' हे गाणं वाजताना दिसत आहे. अनन्या रिक्षामध्ये एका मैत्रिणीसोबत दिसत आहे. मात्र व्हिडीओमध्ये तिची मैत्रिण तिचा चेहरा लपवताना दिसत आहे.ट्राफिक टाळण्यासाठी अनन्याने कार सोडून ऑटोने प्रवास करणे पसंत केल्याचे बोलले जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अनन्या पांडेच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, ती शेवटची आयुष्मान खुरानासोबत 'ड्रीम गर्ल 2' मध्ये दिसली होती. आता लवकरच ती 'खो गये हम कहाँ' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अर्जुन वरण सिंग दिग्दर्शित या चित्रपटात अनन्या सिद्धांत चतुर्वेदीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. पुढील महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय अनन्याकडे 'कंट्रोल' आणि 'शंकरा' यासारखे प्रोजेक्ट्सही आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.