दर्जेदार मराठी चित्रपट (Marathi Movie) निर्मितीस अर्थसहाय्य अनुदान योजनेंतर्गत २५ मराठी चित्रपटांना तब्बल साडेआठ कोटी रुपयांचं अनुदान देण्यात आलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून (Shinde-Fadnavis Government) हे अनुदान जाहीर करण्यात आलं आहे. दर्जानुसार या चित्रपटांना हे अनुदान दिले जाणार आहे.
शासन निर्णयानुसार काही चित्रपटांना ३९ लाख रुपये तर काही चित्रपटांना २९ लाखांचं अनुदान दिले जाणार आहे. ज्या चित्रपटांना शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे त्यामध्ये अनेक दर्जेदार आणि चांगल्या चित्रपटांचा समावेश आहे.
शासनाकडून ज्या चित्रपटांची यादी अनुदानासाठी जाहीर करण्यात आली आहे. त्या सर्व चित्रपटांना धनादेश वितरण करण्यात येणार आहे. २० ऑक्टोबर म्हणजे आज सायंकाळी ६ वाजता मुंबईतल्या प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरामध्ये हा वितरण कार्यक्रम पार पडणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते धनादेश वितरण केले जाणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दर्जेदार चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेनुसार ‘अ’ दर्जा आणि 'ब' दर्जानुसार अनुदान दिले जाते. 'अ' दर्जा मिळालेल्या चित्रपटांना ४० लाख रुपये इतके अनुदान दिले जाते. तर ‘ब’ दर्जा मिळालेल्या चित्रपटांना ३० लाख रुपये इतके अनुदान दिले जाते. आता हा दर्जा कसा दिला जातो असा प्रश्न अनेकांना पडतो. तर परिक्षणाअंती ज्या चित्रपटांना ७१ च्या पुढे गुण असतील त्यांना ‘अ’ दर्जा दिला जातो. तर ५१ ते ७० गुण असणाऱ्या चित्रपटांना ‘ब’ दर्जा दिला जातो.
'अ' दर्जा मिळालेले चित्रपट -
'दशक्रिया', 'बार्डो', 'बापजन्म', 'झिपऱ्या', 'रेडिमिक्स', 'बॉईज', 'सुपसपाटा', 'एक सांगायचं- अनसेड हार्मोनी', 'मिस यू मिस्टर', 'Wedding चा सिनेमा', 'स्माइल प्लिझ', 'येरे येरे पैसा', 'मन उधान वारा' या सर्व चित्रपटांना 'अ' दर्जा मिळाला असून या सर्व चित्रपटांना शासनाकडून अनुदान म्हणून ३९ लाखांची रक्कम दिली जाणार आहे.
'ब' दर्जा मिळाले चित्रपट -
'सन १९८१', 'एच टु ओ कहाणी थेंबाची', 'जजमेंट', 'शिमगा', 'सिटीझन', 'लव्ह यु जिंदगी', 'लकी', 'रंगिला रायबा', 'हॅप्पी बर्थडे', 'पल्याडवासी', 'पोशिंदा', 'हाक' या सर्व चित्रपटांना ब दर्जा देण्यात आला आहे. या चित्रपटाना राज्य शासनाकडून अनुदान म्हणून २९ लाख रुपये रक्कम दिली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.