अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेत्री क्रिती सेनन आणि बिग बी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'गणपत' आज प्रदर्शित झाला आहे. विकास बहल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. काल या चित्रपटाचा प्रीमियर पार पडला. 'गणपत; अ हिरो इज बॉर्न' चित्रपटाच्या प्रीमियरला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली आहे.
विकास बहल यांचा टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन यांच्या सोबतच हा दुसरा चित्रपट आहे. याआधी 'हिरोपंती' या चित्रपटामध्ये हे त्रिकुट एकत्र दिसले होते. ९ वर्षांनी पुन्हा एकदा विकास, टायगर आणि क्रिती यांनी 'गणपत'मध्ये काम केले आहे.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'गणपत' चित्रपट २ तास १५ मिनिटांचा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाचे बजेट २०० कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. भारतात २२५० स्क्रीनवर दाखविण्यात आलेल्या या चित्रपटाचा रिव्ह्युव्ह नेटकऱ्यांनी एक्सवर (ट्विटर) शेअर केला आहे.
टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन यांच्या या चित्रपटातील अॅक्शनचे खूप कौतुक होत आहे. भविष्यकाळातील हा चित्रपट एखाद्या हॉलिवूड चित्रपटासारख्या भासत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे. अॅक्शन, रोमान्स, थ्रिल आणि सस्पेन्स सर्वकाही तुम्हाला या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.
एका नेटकाऱ्याने म्हटल आहे की, 'खूप सुंदर बॉलिवूड चित्रपट क्लास अभिनय आणि स्वॅग आहे टायगर श्रॉफमध्ये. क्रिती देखील गॉर्जस दिसत आहे. फर्स्ट हाल्फ चांगला आहे परंतु सेकंड हाल्फ फुल्ल थ्रिल राईड आहे. शेवट अजिबात मिस करू नका.
दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले आहे, 'जेव्हा समाज संपतो, तेव्हा लोक त्यांच्या अस्तितवासाठी कसा लढा देतात हे या चित्रपटामध्ये दाखविण्यात आले आहे. 'गणपत'मध्ये थ्रिलिंग अॅक्शन आणि अप्रतिम व्हिजुअलस आणि साउंड इफेक्ट. टायगर श्रॉफ आणि करिती सेनन यांची केमिस्ट्री भन्नाट आहे.
'चित्रपटातील गाण्यांनी अंगावर काटा येतो. 'गणपत' चित्रपट खूप सुंदर आहे. नव्या विश्वास अमेझिंग अनुभव.' अशा पॉसिटीव्ह कमेंट नेटकरी चित्रपटाविषयी करत आहेत.
करण जोहर, आशा भोसलेसह अनेक कलाकारांनी चित्रपटातील अॅक्शनचे कौतुक केले आहे.
तर काही नेटकऱ्यांनी चित्रपट आवडला नसल्याचे देखील म्हटले आहे. हा चित्रपट एकदा पाहण्यासाठी चांगला आहे. तर 'टायगर श्रॉफ हिरो आहे पण अभिनेता नाही' अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. (Latest Entertainment News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.