Odia Actress Mousumi Nayak Arrested Facebook
मनोरंजन बातम्या

Actress Mousumi Nayak Arrested: प्रसिद्ध अभिनेत्रीला पोलिसांनी केली अटक, धक्कादायक कारण आलं समोर

Actress Mousumi Nayak News: पोलिसांनी प्रसिद्ध उडिया अभिनेत्रीला एका तरुण महिला लेखिकेला ब्लॅकमेल केल्याबद्दल आणि तिची सार्वजनिक प्रतिमा खराब केल्यामुळे अटक केली आहे.

Chetan Bodke

Odia Actress Mousumi Nayak Arrested

उडिया सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. उडिया अभिनेत्री मौसमी नायकला पोलिसांनी १३ नोव्हेंबरला म्हणजे सोमवारी अटक करण्यात आली. ओडिसा पोलिसांनी मौसमी नायकला एका तरुण महिला लेखिकेला ब्लॅकमेल केल्याबद्दल आणि तिची सार्वजनिक प्रतिमा खराब केल्यामुळे अटक केली आहे. इतकंच नाही तर, लेखिका बनस्मिता पतीसोबत मौसमीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप सुद्धा केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भुवनेश्वरमधील इन्फोसिटी पोलिस ठाण्यात बनस्मिताच्या तक्रारीच्या आधारे अभिनेत्रीवर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे मौसमीला अटक केली आहे. भुवनेश्वर पोलिस उपायुक्त (डीसीपी) कार्यालयाने असे एका निवेदनात म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौसमी नायकने याआधी लेखिका बनस्मिताच्या विरोधात इन्फोसिटी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. बनस्मिताने मौसमीला ५.८ लाख रुपये परत न केल्यामुळे मौसमीने तक्रार दाखल केली होती. यावेळी दोघांमध्ये समन्वय झाला आणि त्यानंतर तक्रार मागे घेतली. (Bollywood)

पोलिसांनी सांगितले की, लेखिकेने अभिनेत्रीला पैसे परत दिले आहेत. तसंच मौसमीने देखील विश्वास दाखवला होता की ती लेखिकेची प्रतिमा खराब करणारे कोणतेही पाऊल उचलणार नाही. असे असताना देखील पैसे परत मिळाल्यानंतर अभिनेत्रीने मीडियासमोर लेखिका आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात वक्तव्य केले. तसंच, लेखिका बनास्मिताच्या पतीविरोधात चंदका पोलिस ठाण्यात खोटी तक्रार दाखल केली. एवढंच नाही तर मौसमीने लेखिका आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणारे मेसेजही पाठवले होते. (Bollywood News)

याप्रकरणाच्या चौकशीदरम्यान, अभिनेत्रीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी अभिनेत्रीविरोधात भारतीय दंडसंहिता कलम ३८५, २९४, ५०६ आणि ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT