Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरमध्ये भयंकर घटना घडली. १५ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या मुलीला ५ दिवस जंगलात डांबून ठेवण्यात आले होते. या प्रकरणी ३ जणांना पोलिसांनी अटक केली.
Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण, ५ दिवस जंगलात डांबून ठेवत बलात्कार; अहिल्यानगर हादरले
Ahilyanagar CrimeSaam Tv
Published On

Summary:

  • अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला

  • १५ वर्षीय मुलीचे अपरहण करून तिला ५ दिवस जंगलात डांबून ठेवण्यात आले

  • या मुलीवर आरोपीने बलात्कार केला

  • याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली

सचिन बनसोडे, अहिल्यानगर

अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ही घटना अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यात घडली. १५ वर्षीय मुलीचं अपहरण करून तिला ५ दिवस जंगलात ठेवले आणि आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळत पीडित मुलीची सुटका केली. या घटनेमुळे अहिल्यानगर हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ फेब्रुवारी रोजी राहुरी पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्रे फिरवत आरोपींना अटक केली. ५ दिवसांनंतर नाशिक–सुरत रोडजवळ रामशेज किल्ला परिसरातील जंगलातून मुलीची सुटका करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण, ५ दिवस जंगलात डांबून ठेवत बलात्कार; अहिल्यानगर हादरले
Crime: सामूहिक बलात्कारानंतर महिलेची हत्या, शेतामध्ये नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

१३ फेब्रुवारी रोजी कॉलेजला जाते असं सांगून घराबाहेर पडलेली १५ वर्षीय मुलगी घरी परत आलीच नाही. पालकांनी तात्काळ राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचा गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरू केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगाने हलवली. नाशिक जिल्ह्यातील जंगल परिसरातून मुलीची सुटका करण्यात पोलिसांना यश मिळालं.

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण, ५ दिवस जंगलात डांबून ठेवत बलात्कार; अहिल्यानगर हादरले
Crime: मौलवीकडून १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, पीडितेने दिला बाळाला जन्म

या प्रकरणात मुख्य आरोपीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली. पीडितेच्या जबाबानुसार पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास राहुरी पोलिस करत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ संबंधित मुलीच्या गावात बंद ठेवण्यात आला होता. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण, ५ दिवस जंगलात डांबून ठेवत बलात्कार; अहिल्यानगर हादरले
Navi Mumbai Crime: “पोलीस ठाण्यात गेलास तर मर्डर”; खारघरमध्ये तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com