Vijay Wadettivar: वडेट्टीवारांना जीवे मारण्याची धमकी! मुख्यमंत्र्यांकडे केली सुरक्षेत वाढ करण्याची मागणी

Vijay Wadettivar: विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.
Vijay Wadettivar
Vijay WadettivarSaam Tv
Published On

Threat to vijay Wadettivar Opposition Leader of Maharashtra Assembly :

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहित सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केलीय. एएनआयनं याबाबत माहिती दिली आहे. याआधीही वडेट्टीवार यांना धमक्या मिळाल्या होत्या. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजाबद्दल विधानं केली होती. त्यामुळे त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या आणि मॅसेज येत आहेत. वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध व्यक्त केलाय. त्यामुळं मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माध्यमांतील वृत्तानुसार, विजय वडेट्टीवारांना गेल्या काही दिवसांपासून फोनवरुन मेसेजच्या स्वरुपात धमक्या येत आहेत. दरम्यान त्यांनी याबाबत त्यांनी मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर भाष्य करण्यास नकार दिला. पण मी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल्याचं त्यांनी एबीपी माझाने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित त्यांनी आपल्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, मागणी केलीय. सध्या वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते असल्याने वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे. ही सुरक्षा धमक्या मिळत असल्यानं अपुरी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अधिक सुरक्षा देण्याची मागणी वडेट्टीवार यांनी पत्रात केलीय. पण अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांच्या मागणीवर कोणती कार्यवाही करण्यात आलीय याची माहिती मिळालेली नाहीये.

दरम्यान याआधीही विजय वडेट्टीवार यांना धमक्या आल्या आहेत. २०१७-१८ मध्ये मराठा समाजाने मूक मार्चा काढत आरक्षणाची मागणी केली होती. त्यावेळीही विजय वडेट्टीवार यांना धमक्या देण्यात आल्या होत्या. आता ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये, अशी वडेट्टीवारांची मागणी आहे. तर मराठा समाजाला सरकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी केली जात आहे. परंतु या मागणीला विजय वडेट्टीवारांचा विरोध आहे. तर वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातही प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर त्यांना धमक्या येत आहे.

Vijay Wadettivar
Manoj Jarange Patil: अन्यथा बीडमधील मराठा रस्त्यावर उतरेल; मनोज जरांगेंचा सरकारला आणखी एक अल्टिमेटम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com