अभिजीत देशमुख
कल्याण : चोरीच्या घटनेतील एक संशयित इराणी वस्तीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या सराईत इराणी (kalyan) चोरट्याला अटक करण्यास गेलेल्या पोलीसांवर इराणी चोरट्यासह २० ते २५ जणांच्या जमावाने दगडफेक करत हल्ला केला. या हल्ल्यात आठ ते दहा पोलीस (police) जखमी झालेत. ही धक्कादायक घटना कल्याणजवळ आंबिवली येथील इराणी वस्तीत घडली. (Maharashtra News)
कल्याणजवळील आंबिवली परिसरात इराणी वस्ती असून या वस्तीला चोरट्यांची वस्ती म्हणून ओळखले जाते. चैन स्नेचिंग, भूलथापा मारुन अनेक लाखो नागरीकांना आत्तापर्यंत यांनी लूटले आहे. जिल्ह्यात राज्यात नव्हे तर देशभरात या इराणी चोरट्यांचे जाळे पसरले आहे. पोलिस या इराणी चोरट्यांना पकडण्यासाठी जातात; मात्र अनेकदा या वस्तीमधील इराणी पोलिस पथकावर हल्ले करतात. या हल्ल्यात (Crime News) महिलांचा देखील समावेश असतो. दरम्यान अंधेरी पोलिस ठाण्याचे पोलिस एका आरोपीच्या शोधात आले होते. त्यांच्यासोबत खडकपाडा पाेलिस ठाण्याचे काही पोलिस गेले होते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दगडफेकीच्या गोंधळात दोन आरोपी फरार
वस्तीतून रात्री २ वाजताच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने तीन इराणी चोरट्यांना ताब्यात घेतलं. तिघांना घेऊन परत जात असताना इराणी वस्तीतील महिला- पुरुष आणि चोरट्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना विरोध करत दगडफेक सुरु केली. या दगडफेकीत १० पोलिस जखमी झाले. रात्री अंधार असल्याने त्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती होती. गोंधळाचा फायदा घेत अटक करण्यात आलेल्या तीन मधील दोन चोरट्यानी पळ काढला. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीत महिला पुरुषांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.