नागराज मंजुळे यांचे नाव घेतले की, आपल्या नजरेसमोर वैविध्यपूर्ण कलाकृतीची यादी दिसते. नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी चर्चेत राहिलेले नागराज मंजुळे सध्या ‘नाळ २’मुळे चर्चेत आले आहेत. नागराज मंजुळे यांचा ‘नाळ २’ दिवाळीच्या शुभमुहूर्तावर थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. नुकताच या चित्रपटानिमित्त निर्मात्यांनी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत नागराज मंजुळे यांनी आपल्या लव्हस्टोरीचा खुलासा केला आहे. (Marathi Film)
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
‘मुंबई तक’ वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये नागराज मंजुळे यांनी लव्हस्टोरीबद्दल सांगितले. नागराज आणि त्यांची पत्नी गार्गी कुलकर्णी यांची लव्हस्टोरी कशी फुलली याबद्दल त्यांनी सांगितले. “माझी आणि गार्गीची भेट अहमदनगरमध्ये झाली होती. गार्गीला आधीपासूनच वाचनाची आणि कवितेची फार आवड आहे. मी ज्यावेळी कोणत्याही सिनेमाची पटकथा लिहितो, तेव्हा ती लिहिल्यानंतर मी काही लोकांना ती वाचून दाखवतो. त्यांच्या नकारात्मक किंवा सकारात्मक प्रतिक्रियेमुळे मला कामामध्ये कॉन्फिडन्स येतो. त्यातली एक गार्गी आहे.” (Film Director)
पुढे त्यांनी मुलाखतीत सांगितले की, “माझ्या सर्वच चित्रपटातल्या कथा मी गार्गीला ऐकवतो. तिला साहित्याची समज आहे. त्याचा फायदा मला नेहमीच कथेमध्ये होतो. माझ्या आजवरचा जेवढ्या क्रिएटिव्हिटी आहेत. त्यामध्ये मोलाचा वाटा गार्गीचा आहे.” नागराज यांच्या अनेक सिनेमांची निर्मिती गार्गीने केली आहे. तिने सैराट, झुंड आणि घर बंदुक बिर्याणी या चित्रपटांची निर्मिती केली. (Actor)
‘नाळ २’ बद्दल सांगायचे तर, चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत श्रीनिवास पोकळे चैत्याच्या भूमिकेत, नागराज मंजुळे चैत्याच्या वडीलांच्या भूमिकेत तर दीप्ती देवी पार्वती म्हणजे चैत्याच्या खऱ्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे.
सुधाकर रेड्डी यंक्कटी दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ २’ प्रेक्षकांना चांगलाच प्रतिसाद मिळतोय. ‘नाळ’ चा पहिला भाग २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला २०१९ मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सुधाकर रेड्डी यंक्कटी यांना तर, सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा श्रीनिवास पोकळेला पुरस्कार मिळाला होता. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.