Bharti Singh SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bharti Singh : भारती सिंहनं जाळली महागडी लबुबू डॉल, VIDEO शेअर करत सांगितलं कारण

Bharti Singh Burned Labubu Doll : कॉमेडी क्वीन भारती सिंहने महागडी लबुबू डॉल जाळली आहे. ज्याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. नेमकं कारण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

भारती सिंहने आजवर आपल्या कॉमेडी शैलीने जगाला हसवले आहे.

भारतीने महागडी लबुबू डॉल जाळली आहे.

भारतीने युट्यूब चॅनलवर याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

कॉमेडियन भारती सिंहने (Bharti Singh) आजवर आपल्या कॉमेडी शैलीने जगाला हसवले आहे. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. भारती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. भारतीचे युट्यूब चॅनल देखील आहे. ज्यावर ती रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचे अपडेट देत असते. नुकताच भारतीने एक व्लॉग शेअर केला आहे. जो सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण या व्लॉगमध्ये भारती सध्या ट्रेडिंग असलेली लबुबू डॉल (Labubu Doll) जाळून टाकताना दिसत आहे. नेमकं झाले काय, जाणून घेऊयात.

भारती सिंहने युट्यूबवर शेअर केलेल्या व्लॉगमध्ये सांगितले की, लबुबू डॉल घरी आल्यापासून तिच्या मुलाची (लक्ष्य सिंह लिंबाचिया) ज्याला प्रेमाने गोला बोलतात, त्याच्या वागण्यात बदल झालेले पाहायला मिळत आहे. तो खूप चिडचिड करत आहे. त्यामुळे भारती लबुबू डॉल जाळण्याचा निर्णय घेते. भारतीला लबुबू डॉल जाळताना पाहून तिचा पती हर्ष लिंबाचिया आणि भारतीच्या मुलाला सांभाळणारी महिला घाबरली आहे. गोला आणि हर्ष भारतीला लबुबू डॉल जाळण्यापासून रोखताना दिसत आहेत.

भारती लबुबू डॉल जाळण्याचा खूप प्रयत्न करते. मात्र ती जळली जात नाही तेव्हा ती लबुबू डॉल एका कागदात गुंडाळते आणि जाळते. अशाप्रकारे भारती अखेर लबुबू डॉल जाळून टाकते. भारती व्हिडीओमध्ये म्हणते की, "मित्रांनो लबुबू जाळला आहे. सैतान नेहमी पराभूत होतो आणि देव नेहमी जिंकतो. वाईटाचा पराभव आणि सत्याचा विजय झाला आहे. " हर्ष भारतीला तिच्या या कृतीमुळे 'अंधश्रद्धाळू' असा टोमणा मारतो.

भारतीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काही लोक भारतीच्या कृतीचे समर्थन करताना दिसत आहेत. तर काही लोक हे अंधश्रद्धेचे उदाहरण असल्याचे म्हणत आहेत. भारती सिंह सध्या लाफ्टर शेफ्स होस्ट करताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

ईश्वरपुरात बलात्कारी राक्षस, सामुहिक अत्याचारानंतर नग्न धिंड

एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना जबरा धक्का! ऐन निवडणुकीत मनसेच्या प्रमुख शिलेदारांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश

Winter Clothing Color: थंडीत कोणत्या रंगाचे कपडे वापरले पाहिजेत आणि का?

SCROLL FOR NEXT