Bad Newz Vs Sarfira Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bad Newz Vs Sarfira : विकी कौशलच्या ‘बॅड न्यूज’ची प्रेक्षकांमध्ये तुफान चर्चा, अक्षय कुमारच्या ‘सरफिरा’ची कमाई काय?

Bad Newz Vs Sarfira Collection : ‘बॅड न्यूज’ आणि ‘सरफिरा’ हे दोन्हीही चित्रपट एका आठवड्याच्या फरकाने बॉक्स ऑफिसवर रिलीज झाले आहेत. दोन्हीही चित्रपटांमध्ये सध्या चांगलीच चुरस रंगताना दिसत आहे.

Chetan Bodke

विकी कौशल आणि तृप्ती डिमरीच्या ‘बॅड न्यूज’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. हा चित्रपट १२ जुलैला थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. त्यासोबतच अक्षय कुमारचा ‘सरफिरा’ चित्रपटही रिलीज झालेला आहे.

‘बॅड न्यूज’ आणि ‘सरफिरा’ हे दोन्हीही चित्रपट एका आठवड्याच्या फरकाने बॉक्स ऑफिसवर रिलीज झाले आहेत. दोन्हीही चित्रपटांमध्ये सध्या चांगलीच चुरस रंगताना दिसत आहे. सलग दुसऱ्या आठवड्यातही कोणत्या चित्रपटाची सर्वाधिक चर्चा सुरू आहे, जाणून घेऊया....

‘सरफिरा’ आणि ‘बॅड न्यूज’ हे दोन्हीही चित्रपट वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट आहे. पण प्रेक्षकांकडून सर्वाधिक पसंदी विकी कौशल आणि तृप्ती डिमरीच्या ‘बॅड न्यूज’ चित्रपटालाच मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटातल्या सीन्सची आणि गाण्यांची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होती. या चित्रपटाने एका आठवड्यामध्ये ३४ कोटींची कमाई केलेली आहे.

पण अक्षय कुमारचा ‘सरफिरा’ बॉक्स ऑफिसवर १२ जुलैला रिलीज झालेला आहे. पण तरीही या चित्रपटाला म्हणावा तसा खास प्रतिसाद मिळत नाही. या चित्रपटाने दोन आठवड्यात २२ कोटींचीच कमाई केलेली आहे. अप्रतिम कथानक असतानाही या चित्रपटाला प्रेक्षकांचा इतका खास प्रतिसाद मिळत नाहीये. ८० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ह्या चित्रपटाला निर्मितीचा खर्च वसूल करण्यासाठी फार तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT