Bad Newz Collection : विकी कौशलचा ‘बॅड न्यूज’ बॉक्स ऑफिसवर हिट की फ्लॉप? दुसऱ्या दिवसाच्या कमाईचा आकडा किती?

Bad Newz 2nd Day Collection : आनंद तिवारी दिग्दर्शित ‘बॅड न्यूज’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. विकी कौशल आणि तृप्ती डिमरी स्टारर चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Vicky Kaushal Truptii Dimri Movie
Bad News Film Instagram/ @vickykaushal09
Published On

आनंद तिवारी दिग्दर्शित ‘बॅड न्यूज’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. विकी कौशल आणि तृप्ती डिमरी स्टार चित्रपट १९ जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे. कॉमेडी आणि फॅमिली ड्रामा असलेल्या ह्या चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना भावले असून प्रेक्षकांकडून विकेंडला उत्तम कमाई करताना दिसत आहे. जाणून घेऊया चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईबद्दल...

Vicky Kaushal Truptii Dimri Movie
Aditya Srivastava Birthday : सीआयडी इन्स्पेक्टर अभिजीतचा आज वाढदिवस, अभिनेत्याबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टनुसार, ‘बॅड न्यूज’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ८.३ कोटींची कमाई तर आता दुसर्‍या दिवशी १० कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाने दोन दिवसांत १८.३ कोटींची कमाई केलेली आहे. या रोमँटिक ड्रामा चित्रपटाला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. हे प्रारंभिक आकडे आहेत. कमाईतही वाढ अपेक्षित आहे. चित्रपटाच्या कमाईमध्ये या विकेंडला आणखी कमाई होण्याची शक्यता आहेत.

Vicky Kaushal Truptii Dimri Movie
Dharmaveer 2 Trailer : अंगावर काटा आणणारा 'धर्मवीर - २'चा ट्रेलर लॉन्च

विकी कौशल, तृप्ती डिमरी, ॲमी वर्क, शिबा चढ्ढासह अनेक कलाकार चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली आहे. इशिता मोईत्रा आणि तरुण दुडेजा यांनी लिहिलेला 'बॅड न्यूज' हा २०१९ च्या 'गुड न्यूज' फ्रेंचाइजी चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात सलोनी बग्गा (तृप्ती डिमरी) हीच्या पोटात जुळी मुली आहेत. मनोरंजक गोष्ट म्हणजे या मुलांना एक नाही तर दोन वडील (विकी आणि एमी) आहेत. आता या दोघांपैकी ती आपल्या मुलाचा बाप म्हणून कोणाची निवड करणार, याभोवतीच ही कथा फिरतेय.

Vicky Kaushal Truptii Dimri Movie
Hardik-Natasa Divorce: डिवोर्सवर शिक्कामोर्तब! नताशा किती घेणार पोटगी? किती आहे हार्दिक आणि नताशाची एकूण संपत्ती?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com