Nagraj Manjule New Movie Saam tv
मनोरंजन बातम्या

Nagraj Manjule New Movie: ‘बापल्योक’ चित्रपटाची टीम पोहोचली तुळजाभवानी मातेच्या चरणी; निमित्त होतं खास

Nagraj Manjule New Movie: नागराज मंजुळे यांची प्रस्तुती असलेला ‘बापल्योक’ हा मराठी चित्रपट सध्या त्याच्या ट्रेलर आणि गीतांमुळे चांगलाच गाजत आहे.

साम टिव्ही ब्युरो

BaapLyok Movie News: वडील मुलाच्या नात्याची हळूवार गोष्ट घेऊन ‘बापल्योक’ सिनेमा २५ ऑगस्टला आपल्या भेटीला येत आहे. नागराज मंजुळे यांची प्रस्तुती असलेला ‘बापल्योक’ हा मराठी चित्रपट सध्या त्याच्या ट्रेलर आणि गीतांमुळे चांगलाच गाजत आहे. नुकतीच या चित्रपटाच्या टीमने तुळजापूरच्या तुळजाभवानी आईचे दर्शन घेऊन चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली. (Latest Marathi News)

विशेष म्हणजे 'बापल्योक’ या चित्रपटाचे शूटिंग तुळजापूर परिसरातील असून चित्रपटातील बहुतांशी कलाकार तुळजापूर, सोलापूर परिसरातील आहेत. मकरंद माने या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे असून त्यांच्या मुलाची भूमिका विठ्ठल काळे यांनी साकारली आहे.

या दोघांसोबत अभिनेत्री पायल जाधव, नीता शेंडे चित्रपटात दिसणार आहेत. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

मनापासून केलेली चांगली कलाकृती प्रेक्षकांपर्यत पोहचते. ‘बापल्योक’ चित्रपटाच्या ट्रेलर आणि गीताला मिळलेला प्रतिसाद हेच दाखवून देतो. हा चित्रपट अनेक नानाविध नात्यांची गुंफण आहे. बापलेकाच्या नात्यातील मायेचा पदर उलगडून दाखविणारा 'बापल्योक’ प्रत्येकाला खूप काही देणारा असेल, असा विश्वास निर्माते विजय शिंदे व्यक्त करतात.

दरम्यान, ‘बापल्योक’ सिनेमाची कथा विठ्ठल नागनाथ काळे यांची आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने व विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत. गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांची गाणी सिनेमात असणार आहे. या गाण्यांना विजय गवंडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे. छायांकन योगेश कोळी यांचे आहे. तर संकलन आशय गाताडे यांचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG : जसप्रीत बुमराह OUT, कुलदीप-अर्शदीप IN? निर्णायक कसोटीत भारताचे संभाव्य ११ शिलेदार

Shocking News: नवजात बाळाला गाईचं दूध दिलं, शरीरात झालं इन्फेक्शन; २१ दिवसानंतर मृत्यूच्या दाढेतून बाहेर

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल, स्व. हेमंत करकरे यांच्या आठवणी ताज्या

Mugachi Khichdi Recipe: मऊ, लुसलुशीत मुगाची खिचडी कशी बनवाल?

Ulhasnagar: घराबाहेर पडला अन् टेरेसवर जाऊन स्वत:ला पेटवून घेतलं; उल्हासनगरमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT