Shilpa Shetty Troll: चप्पल न काढताच ध्वजारोहण केल्यामुळे शिल्पा झाली ट्रोल, नेटकऱ्यांना दिले अभिनेत्रीने सणसणीत उत्तर

Shilpa Shetty Independence Day Post: ध्वजारोहण करताना चप्पल घातल्यामुळे नेटकऱ्यांनी शिल्पाला ट्रोल केलं आहे. शिल्पाने ट्रोलर्सला प्रत्युत्तर देखील दिलं आहे.
Shilpa Shetty Celebrated Independence Day
Shilpa Shetty Celebrated Independence DaySaam Tv
Published On

Shilpa Shetty Celebrated Independence Day: काल देशभरात स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी ध्वजारोहण केलं. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर ध्वजवंदन करताना, अनेक फोटो, व्हिडीओही शेअर केले होते. नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने देखील आपल्या कुटुंबियांसोबत स्वातंत्र्य दिन साजरा केला. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ध्वजवंदन करताना, एक व्हिडीओ शेअर केला आहे. शिल्पाने शेअर केलेल्या या व्हिडीओतील कृत्यामुळे अभिनेत्री प्रचंड ट्रोल झाली आहे. ध्वजारोहण करताना चप्पल घातल्यामुळे नेटकऱ्यांनी शिल्पाला ट्रोल केलं आहे. शिल्पाने ट्रोलर्सला प्रत्युत्तर देखील दिलं आहे.

Shilpa Shetty Celebrated Independence Day
Farhan Akhtar On Ranveer: ‘डॉन ३’च्या कास्टिंगबद्दल दिग्दर्शकाने केला महत्वाचा खुलासा, फरहानने सांगितलं शाहरुख खानला डावलण्याचे कारणं...

शिल्पाने शेअर केलेल्या व्हिडीओत, ती आणि तिचे कुटुंबीय ध्वजवंदन करताना दिसत आहे. ध्वजवंदन करत असताना शिल्पाने आणि तिच्या कुटुंबीयांनी चप्पल घातलेली दिसत आहे. यावेळी ट्रोलर्सने शिल्पा शेट्टीसह तिच्या कुटुंबीयांनी चप्पल घातल्यामुळे प्रचंड ट्रोल केले आहे. ट्रोल करताना एक ट्रोलर म्हणतो, “काय मॅडम चप्पल घालून कोण ध्वजारोहण करतं का?”, तर आणखी एक ट्रोलर म्हणतो, “मॅडम ध्वजारोहण करताना किमान आधी चप्पल काढावी.”

शिल्पा ध्वजवंदनाच्या व्हिडीओमुळे प्रचंड ट्रोल झाल्यानंतर तिने नेटकऱ्यांना उत्तर दिले आहे, ती कमेंट करत म्हणते, “ध्वज फडकवतानाचे सर्व पाळावे लागणारे नियम मला माहीत आहेत. ध्वज फडकवताना माझ्या मनात देशाचा आणि ध्वजाचा आदर आहे, प्रश्न मांडण्यासाठी नाही. मला भारतीय असल्याचा गर्व आहे. मनात चांगल्या भावना ठेवून आजची पोस्ट शेअर केली आहे. इतर दिवशी मी ट्रोलर्सकडे मी सहसा दुर्लक्ष करते. पण मी या दिवशी नेटकऱ्यांना दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे तथ्य बरोबर करा.” शिल्पानं दिलेल्या या उत्तराची सध्या नेटकऱ्यांमध्ये बरीच चर्चा सुरू आहे.

Shilpa Shetty Celebrated Independence Day
Deepa Parab Special Post: दीपा परबची 'तु चाल पुढं'च्या वर्षपुर्तीनिमित्त विशेष पोस्ट; पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार

दरम्यान, शिल्पाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शिल्पा, पती राज कुंद्रा, शिल्पाची आई आणि मुलगा विआन दिसत आहे. राज कुंद्रासोबत त्यांचा मुलगा विआन देखील राष्ट्रध्वज फडकवताना दिसत आहे. ध्वज फडकवल्यानंतर शिल्पासोबत तिचे कुटुंबीय राष्ट्रगीतही गाताना दिसत आहेत. सोशल मीडियावर शाहरुख खान, कतरिना कैफ, विकी कौशल, अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासोबत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही आपल्या चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Shilpa Shetty Celebrated Independence Day
Welcome 3 Movie: ‘OMG 2’नंतर अक्षयच्या आगामी चित्रपटाची घोषणा, ‘वेलकम ३’च्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची ही तारीख केली जाहीर

शिल्पा शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री सध्या ध्रुव सरजाच्या आगामी 'केडी: द डेव्हिल' चित्रपटामध्ये सहभाग होण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटामुळे शिल्पा तब्बल १८ वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर टॉलिवूड सिनेसृष्टीत डेब्यू करणार आहे. लवकरच शिल्पा ‘इंडियन पोलीस फोर्स’ या सिरीजमधून शिल्पा शेट्टी डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com