Baahubali: The Epic Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Baahubali: The Epic Collection : बॉक्स ऑफिसवर 'बाहुबली'चा धुराळा; ४ दिवसांत बंपर कमाई अन् रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

Baahubali: The Epic Box Office Collection Day 4 : प्रभासचा 'बाहुबली: द एपिक' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने चार दिवसांत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बाहुबली: द एपिक' चित्रपट 31 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

'बाहुबली: द एपिक' चित्रपटात अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत आहे.

'बाहुबली: द एपिक' चित्रपट एसएस राजामौली यांचा आहे.

एसएस राजामौली यांचा 'बाहुबली: द एपिक' चित्रपट 31 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रभास, राणा दग्गुबती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत झळकले आहेत. 'बाहुबली: द एपिक' चित्रपट 120 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आली आहे. चित्रपटाचे चार दिवसांचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'बाहुबली: द एपिक' बॉक्स ऑफिस कलेक्शन

सॅकनिल्कच्या मीडिया रिपोर्टनुसार, 'बाहुबली: द एपिक' चित्रपटाने रिलीजच्या चौथ्या दिवशी 1.35 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 25 कोटींच्यावर झाले आहे.

  • पहिला दिवस - 9.65 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 7.25 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 6.3 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 1.35 कोटी रुपये

  • एकूण - 25.7 कोटी रुपये

मीडिया रिपोर्टनुसार, 2015 साली रिलीज झालेल्या 'बाहुबली: द बिगिनिंग' चित्रपटाने जगभरात 650 कोटी रुपये कमावले आहेत. तर 2017 साली रिलीज झालेल्या 'बाहुबली २: द कन्क्लूजन' चित्रपटाने 1788.06 कोटी कमावले. 'बाहुबली: द एपिक' चित्रपट 'बाहुबली: द बिगिनिंग' आणि 'बाहुबली २: द कन्क्लूजन' चित्रपटांना एकत्र करून बनवण्यात आला आहे.'बाहुबली: द एपिक' चित्रपट महिष्मतीच्या जगात घेऊन जाते.'बाहुबली: द एपिक' सिनेमा तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

'द ताज स्टोरी' बॉक्स ऑफिस कलेक्शन

31 ऑक्टोबरला परेश रावल यांचा 'द ताज स्टोरी' चित्रपट रिलीज झाला आहे. सॅकनिल्कच्या मीडिया रिपोर्टनुसार, 'द ताज स्टोरी' चित्रपटाने सोमवारी 1.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाचे चार दिवसांचे एकूण कलेक्शन 6.90 झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्याच्या जुन्नरमधील बिबट्या शिफ्ट करणार

Best Playing 11 : आश्चर्याचा धक्का! हरमनप्रीत कौरला संघातूनच काढलं, आयसीसीनं बेस्ट टीमचं कर्णधारपद दिलं भलत्याच खेळाडूकडं

Pune News : सूर्योदयापूर्वी अवैध धंदे तोडून टाका; पुणे पोलीस आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Apurva Gore: आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज; फोटो पाहा

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात कोणते उद्योगधंदे भरभराटीस होते?

SCROLL FOR NEXT