Heart Attack: तुमच्या या 5 चुकींमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका, डॉक्टरांनी सांगितलेले हे बदल लगेचच करा फॉलो

Health Tips: चुकीच्या जीवनशैली, ताणतणाव आणि अयोग्य आहारामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. तज्ज्ञांच्या मते, काही सवयी बदलून, योग्य आहार आणि व्यायाम केल्यास हृदयाचे आरोग्य चांगले ठेवता येते.
5 Daily Habits That Increase Heart Attack Risk
Heart Attack Riskgoogle
Published On

अनेकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी हल्ली बदलताना पाहायला मिळतायेत. पुर्वी लोक लहान मुलांना प्रोटीन म्हणून नाचणीसत्व द्यायचे आता त्यांना मार्केटमधले डेरी प्रोडक्ट दिले जातात. यामुळे त्यांच्या मेंदूवर खूप प्रमाणात परिणाम होतो पण पालकांना तो जाणवत नाही. मुळात पालकच त्यांच्या कामाच्या गडबडीमुळे बऱ्याचदा मुलांना बाहेरचे पदार्थ खाण्यासाठी प्रवृत्त करतात असं आपण म्हणू शकतो.

पालकांना त्यांच्या वयात खूप जबाबदाऱ्या असतात, महागाई वाढलेली पाहायला मिळते, मुलांचं शिक्षण असतं, घरातल्यांची आजारपणं असतात यासगळ्यामुळे त्यांच्याही आयुष्यात किंवा जीवनशैलीत खूप बदल पाहायला मिळतात.

बऱ्याचदा हेच बदल तुमच्या थेट ह्रदयावर परिणाम करतात. सध्याच्या प्रसारित होण्याऱ्या अनेक लेखांमध्ये आणि संशोधनामध्ये असं आढळतंय की, दरवर्षी लाखो लोक हे हार्ट अटॅकमुळे त्यांचा जीव गमावत आहेत. तज्ज्ञांच्या मते, काही लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका आनुवंशिक कारणांमुळे असू शकतो, मात्र अनेक वेळा आपल्या दैनंदिन जीवनशैलीमुळेही हा धोका वाढतो.

5 Daily Habits That Increase Heart Attack Risk
High Blood Pressure Risk : उन्हामुळे वाढेल BPचा धोका, डॉक्टरांनी सांगितली सुरुवातीची 7 लक्षणं, वेळीच घ्या जाणून

आहार, व्यायाम, ताणतणाव आणि काही वाईट सवयी यांचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे रोजच्या आयुष्यातील काही साध्या सवयी बदलल्यास हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते, हेल्दी निरोगी राहण्याठी सगळ्यात आधी तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करा. जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट, जास्त शिजवलेलं अन्न आणि शुगर फ्री खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं, वजन वाढू शकतं आणि BP सुद्धा वाढण्याची शक्यता असते. हे सर्व घटक हृदयविकाराचा धोका वाढवतात. त्यामुळे आहारात फळं, भाज्या, संपूर्ण धान्ये, मासे, डाळी, कडधान्ये आणि चिकन यांसारखे लीन प्रोटीन यांचा समावेश करा. तसेच ऑलिव्ह ऑईल, बदाम, बिया आणि अवोकॅडो यांसारख्या चांगल्या फॅट्सचा वापर हार्टसाठी फायदेशीर मानला जातो.

खाण्यासोबत रोज किमान ३० मिनिटं व्यायाम करा किंवा थोड्या वेगाने सलग चाला. याने मेटाबॉलिझम सुधारतो. जास्त ताण घेऊ नका. एखाद्या गोष्टीचा एखाद्याच्या बोलण्याचा, पैशाचा, कामाचा ताण जास्त घेऊ नका. तसेच धुम्रपानाच्या आहारी जास्त जाऊ नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरेशी झोप घ्या.


टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

5 Daily Habits That Increase Heart Attack Risk
Reliance Jioचे नवे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान; वाचा संपूर्ण लिस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com