NPCIL Recruitment: NPCIL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पगार ५६,१०० रुपये; अर्ज कसा करावा?

NPCIL Recruitment 2025: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. एनपीसीआयएलमध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे.
NPCIL Recruitment
NPCIL RecruitmentSaam Tv
Published On
Summary

NPCIL मध्ये नोकरीची संधी

डेप्युटी मॅनेजर अन् हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी भरती

अर्ज कसा करावा?

नोकरीच्या शोधात आहात तर ही बातमी तुमच्यासाठी. न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एनपीसीआयएलमध्ये डेप्युटी मॅनेजर आणि ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. (NPCIL Recruitment)

NPCIL Recruitment
Pune IT Jobs : टाटांच्या कंपनीत नोकरकपात, पुण्यातील २५०० कर्मचाऱ्यांना राजीनामा द्यायला लावला, कुटुंबाच्या अडचणी वाढल्या

न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये एकूण १२२ पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला npcil.nic.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ७ नोव्हेंबर २०२५ पासून सुरु होणार आहे. नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०२५ आहे.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

एनपीसीआयएलमध्ये डेप्युटी मॅनेजर (एचआर), डेप्युटी मॅनेजर (F&A), डेप्युटी मॅनेजर(C& MM), डेप्युटी मॅनेजर (लीगल), ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर पदांसाठी भरती केली जाणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पदवी प्राप्त केलेली असावी.डेप्युटी मॅनेजर पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन, एमबीए, एलएलबी आणि सीए पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी आधी अधिसूचना वाचावी.

NPCIL Recruitment
Job Fraud : आरोग्य विभागात घोटाळा! एकच व्यक्ती, ६ जिल्ह्यात नोकरीला, सरकारला लावला कोट्यवधीचा चुना

वयोमर्यादा

डेप्युटी मॅनेजर पदासाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करावेत. हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी २१ ते ३० वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करावेत.

सॅलरी

डेप्युटी मॅनेजर पदासाठी पे लेव्हल १०नुसार ५६,१०० रुपये दिले जाणार आहे. ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी लेव्हल ६ नुसार ३५,४०० रुपये पगार मिळणार आहे.

NPCIL Recruitment
Metro Jobs: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार मेट्रोत नोकरीची संधी; पगार २.८० लाख; अर्ज कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com