Delhi Metro Job
Delhi Metro JobSaam Tv

Metro Jobs: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार मेट्रोत नोकरीची संधी; पगार २.८० लाख; अर्ज कसा करावा?

Delhi Metro Recruitment 2025: दिल्ली मेट्रोत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. दिल्ली मेट्रोत जनरल मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Published on

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांच्या कामाची बातमी आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये आता नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. दिल्ली मेट्रोत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज पाठवायचे आहेत. दिल्ली मेट्रोतील नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०२५ आहे.इच्छुकांनी त्याआधी अर्ज करायचे आहेत.तुम्हाला हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.

Delhi Metro Job
Airport Jobs: १०वी,१२वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! एअरपोर्टमध्ये नोकरी करण्याची संधी; १४०० पदांसाठी भरती

दिल्ली मेट्रोतील या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. तुम्हाला delhimetrorail.com या वेबसाइटवर जाऊन फॉर्म डाउनलोड करायचा आहे. हा अर्ज भरुन तुम्हाला जनरल मॅनेजर (एचआर), प्रोजेक्ट दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो भवन, फायर ब्रिगेड लेन, बारखंभा रोड, नवी दिल्ली येथे पाठवायचा आहे. तुम्हाला या नोकरीसाठी तुम्ही कागदपत्रांची स्कॅन कॉपी career@dmrc.org या ई मेलवर पाठवायची आहे.

दिल्ली मेट्रोत जनरल मॅनेजर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिविल इंजिनियरिंगमध्ये बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी. तसेच उमेदवाराकडे रेल्वे, केंद्र सरकार, राज्य सरकारच्या विभागात काम करण्याचा अनुभव असायला हवा. याचसोबक कॉम्प्युटर नॉलेजदेखील असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय ५५ ते ५७ पेक्षा जास्त नसावे.

Delhi Metro Job
PGCIL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी अन् २२ लाखांचं पॅकेज; PGCIL मध्ये भरती सुरु; आजच करा अर्ज

परीक्षेशिवाय होणार निवड

या नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. यानंतर इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाणार आहे. इंटरव्ह्यूमध्ये क्लिअर झाल्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला १,२०,००० ते २,८०,००० रुपये पगार मिळणार आहे.

Delhi Metro Job
Railway jobs : ग्रॅज्युएशन झालंय? रेल्वेत करा नोकरी, ५८०० जागांसाठी निघाली मेगा भरती, वाचा A टू Z माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com