
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयजीआय एविशन सर्विसेजमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ आणि लोडर पदासाठी भरती जाहीर केली आहे. १४०० पेक्षा जास्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
एविएशन सर्विसेजमधील या नोकरीसाठी तुम्हाला igiaviationdelhi.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत. १०वी,१२वी पास तरुण या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. फ्रेशर्स तरुणांसाठी नोकरीची ही उत्तम संधी आहे. जर एकाच उमेदवाराला दोन्ही पदांसाठी अर्ज करायचा असेल तरीही ते करु शकतात.
या भरती मोहिमेत एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ पदासाठी १०१७ जागा रिक्त आहेत. लोडर पदासाठी ४२९ जागा रिक्त आहेत.या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला प्रोफेशनल आणि इंटरनॅशनल पदासाठी भरती करु शकतात.
आयजीआय एविएशन सर्विसेज पदासाठी १८ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी ग्राउंड स्टाफ पदासाठी २५००० ते ३५००० रुपये पगार मिळणार आहे. लोडर पदासाठी १५००० ते २५००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करावेत.
पात्रता
एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२वी पास असणे गरजेचे आहे. एअरपोर्ट लोडर पदासाठी १०वी पास असणे अनिवार्य आहे. याचसोबत आयटीआय करणारे विद्यार्थीदेखील ग्राउंड स्टाफ पदासाठी अर्ज करु शकतात.
एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ पदासाठी निवड झाल्यावर उमेदवारांना विमानतळावर चेक इन, एअरलाइन तिकिट आरक्षण, बोर्डिंग आणि टर्मिनलसंबंधित कामे करावी लागणार आहेत. एअरपोर्ट लोडर पदासाठी विमान आणि ट्रॉलिचे काम, कार्गोसंबंधित कामे करावी लागणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.