
मेटा एआय आता हिंदी आणि पोर्तुगीज भाषांमध्ये रील्स भाषांतर आणि डबिंगसह उपलब्ध आहे.
एआय टूल वक्त्याचा मूळ स्वर आणि आवाज जतन करून नैसर्गिक डबिंग तयार करते.
यूजर्स आवश्यक असल्यास मूळ वर्जनकडे परत जाऊ शकतात.
इन्स्टाग्रामने भारतात लोकेशन आधारित इंटरॅक्टिव्ह मॅप फीचर लाँच केले आहे.
मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी इन्स्टाग्रामवर पुष्टी केली आहे की कंपनी आता कंटेंट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. ऑगस्ट महिन्यात सुरू केलेले एआय रील्स आता भाषांतर आणि डबिंग होणार. जे सुरुवातीला केवळ इंग्रजी आणि स्पॅनिश भाषांपुरते मर्यादित होते. आता हिंदी आणि पोर्तुगीजसह अधिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. या विस्तारामुळे निर्माते आणि प्रेक्षकांना भाषेच्या अडथळ्यांवर मात करून विविध भाषांतील कंटेट सहजपणे पाहता आणि ऐकता येईल.
इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी एका व्हिडिओद्वारे हे नवे तंत्रज्ञान प्रत्यक्ष दाखवले. त्यांनी भाषांमध्ये बदल करताना त्यांचा आवाज आणि स्वर हिंदी, स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषांमध्ये सहज डब केला गेला. हे भाषांतर इतके नैसर्गिक होते की जणू मोसेरी त्या भाषेत स्वतः बोलत आहेत असे वाटले. एआय टूल निर्मात्याचा मूळ आवाज आणि टोन ऐकून करून निवडलेल्या भाषेत त्याचे भाषांतर करते. त्यात लिप सिंक पर्यायदेखील आहे, ज्यामुळे वक्त्याच्या ओठांच्या हालचाली भाषांतरित ऑडिओशी जुळतात आणि पाहण्याचा अनुभव अधिक जिवंत आणि वास्तववादी वाटतो.
अपलोड प्रक्रियेत, पात्र क्रिएटर्स ज्यांचे सार्वजनिक खाते आहे किंवा ज्यांना 1,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. भाषांतराचा पर्याय पाहतील. हे क्रिएटर्स ‘मेटा एआयसह तुमचा आवाज भाषांतरित करा’ या फीचरची निवड करून लक्ष्य भाषा ठरवू शकतात. तयार झालेल्या व्हिडिओचे पूर्वावलोकन करून नंतर ते प्रकाशित करू शकतात. प्रत्येक भाषांतरित व्हिडिओवर ‘ट्रान्सलेटेड विथ मेटा एआय’ असा लेबल लावला जाईल. जेणेकरून पारदर्शकता राखली जाईल. तसेच, यूजर्सना तीन डॉट मेनूमधील ऑडिओ आणि भाषा पर्यायांतून ‘भाषांतर करू नका’ निवडून मूळ वर्जनकडे परत जाण्याची सुविधा मिळेल.
दरम्यान, इन्स्टाग्रामने भारतात इंटरॅक्टिव्ह मॅप फीचरची घोषणा केली आहे. हे फीचर यूजर्सना स्थान-आधारित पोस्ट, रील्स आणि स्टोरीज शेअर आणि शोधण्याची परवानगी देते. यात मित्रांसोबत निवडक लोकेशन शेअरिंगची सुविधा, किशोरवयीन यूजर्ससाठी पालक नियंत्रणे आणि सुधारित प्रायव्हसी निर्देशक आहेत. याशिवाय, यूजर्स नकाशावर २४ तासांपर्यंत आसपासची सामग्री पाहू शकतात. ज्यामुळे रिअल-टाइम शोधाचा आणि गोपनीयतेचा समतोल राखला जातो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.