Zoho Mail वर स्विच करण्यापूर्वी जाणून घ्या ५ खास वैशिष्ट्ये, Gmailची गरजच राहणार नाही

Zoho Mail Features: झोहो मेल भारतात झपाट्याने लोकप्रिय होत आहे. Gmail पेक्षा उत्कृष्ट असलेल्या या स्वदेशी ईमेल प्लॅटफॉर्मच्या पाच खास वैशिष्ट्यांबद्दल जाणून घ्या, आणि स्विच करण्याचा विचार करा.
ZOHO MAIL FEATURES 5 REASONS TO SWITCH FROM GMAIL FOR EMAIL PRODUCTIVITY
ZOHO MAIL FEATURES 5 REASONS TO SWITCH FROM GMAIL FOR EMAIL PRODUCTIVITY
Published On

भारतात आता विदेशी तंत्रज्ञानापेक्षा स्वदेशी अ‍ॅप्स आणि प्लॅटफॉर्मला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती वाढत आहे. याचमध्येच झोहो कॉर्पोरेशनचा ईमेल प्लॅटफॉर्म “Zoho Mail” वेगाने लोकप्रिय होत आहे. अरत्ताई (Arattai) अ‍ॅप तयार करणाऱ्या ह्याच कंपनीचा हा नवीन ईमेल पर्याय म्हणून वापर वाढत आहे. आता बरेच लोक जीमेल (Gmail) सोडून झोहो मेलकडे वळत आहेत. झोहो मेल केवळ आकर्षक इंटरफेसमुळे नव्हे, तर उच्च दर्जाच्या सुरक्षा आणि उत्पादकता सुविधांमुळे देखील ईमेल यूजर्समध्ये चर्चेत आला आहे.

मोठे अटॅचमेंट

झोहो मेलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची मोठी अटॅचमेंट क्षमता आहे. यूजर्स एका ईमेलमध्ये १ जीबीपर्यंतच्या फाईल्स सहज पाठवू शकतात. जर फाइलची साईज १ जीबीपेक्षा जास्त असेल, तर झोहो स्वयंचलितपणे त्यासाठी एक लिंक तयार करते आणि ती ईमेलमध्ये जोडते. याउलट, मेलमध्ये फक्त २५ एमबीपर्यंतचे अटॅचमेंट पाठवता येते आणि त्यापेक्षा मोठ्या फाईल्ससाठी गुगल ड्राइव्ह लिंकचा वापर करावा लागतो. त्यामुळे डेटा शेअरिंगच्या बाबतीत झोहो मेल अधिक सोयीचे ठरते.

S/MIME सुरक्षा

झोहो मेल यूजर्सना अधिक सुरक्षित अनुभव देण्यासाठी S/MIME एन्क्रिप्शन सपोर्ट देखील देते. TLS एन्क्रिप्शन व्यतिरिक्त, ही सुविधा ईमेल एन्क्रिप्शनची अतिरिक्त पातळी उपलब्ध करून देते. ज्यामुळे व्यावसायिक यूजर्सचे संदेश अधिक सुरक्षित राहतात.

स्मार्ट फिल्टर्स

स्मार्ट फिल्टर्स हे झोहो मेलचे आणखी एक आकर्षक वैशिष्ट्य आहे. हे फिल्टर्स येणाऱ्या ईमेलचे विश्लेषण करून त्यांना सूचना, वृत्तपत्रे, प्रमोशनल मेल्स अशा स्वतंत्र फोल्डर्समध्ये वर्गीकृत करतात. त्यामुळे यूजर्सना महत्त्वाच्या ईमेल्स शोधणे आणि इनबॉक्स स्वच्छ ठेवणे सहज शक्य होते.

ईमेल रिटेन्शन आणि ई-डिस्कव्हरी

कंपनींसाठी झोहो मेलने ईमेल रिटेन्शन आणि ई-डिस्कव्हरी ही विशेष सुविधा दिली आहे. या माध्यमातून संस्थांना सर्व ईमेल्सचा बॅकअप ठेवता येतो आणि आवश्यक असल्यास कायदेशीर कारणांसाठी विशिष्ट मेल्स Retention करता येतात. डेटा ऑडिटिंग आणि अनुपालनाच्या दृष्टीने हे वैशिष्ट्य अत्यंत उपयुक्त ठरते.

Integrated Productivity Tools

तसेच, झोहो मेलमध्ये यूजर्ससाठी आवश्यक सर्व साधने एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. फायलींसोबत नोट्स, कॅलेंडर, संपर्क आणि बुकमार्क्स या सर्व सुविधा थेट मेलच्या इंटरफेसमध्ये एकत्रित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यूजर्सना वेगवेगळ्या अ‍ॅप्समध्ये वारंवार स्विच न करता कामे एका ठिकाणी पार पाडणे सोपे होते.

एकूणच, झोहो मेल हा भारतीय यूजर्ससाठी एक मजबूत, सुरक्षित आणि स्वदेशी ईमेल पर्याय म्हणून झपाट्याने आपले स्थान निर्माण करत आहे. स्वदेशी तंत्रज्ञानावर वाढत्या विश्वासामुळे या प्लॅटफॉर्मकडे केवळ वैयक्तिक यूजर्सच नव्हे तर अनेक भारतीय कंपन्याही वळताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com