AI शिकायचंय का? Jio ने लाँच केला फ्री ‘AI Classroom’ कोर्स; काय शिकवले जाणार वाचा सविस्तर

Jio AI Classroom: रिलायन्स जिओने जिओपीसी आणि जिओ इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने 'एआय क्लासरूम' हा मोफत ऑनलाइन कार्यक्रम सुरू केला आहे. चार आठवड्यांचा हा कोर्स एआयचे मूलभूत ज्ञान आणि उपयोग शिकवेल.
JIO LAUNCHES FREE AI CLASSROOM COURSE TO PROMOTE DIGITAL LEARNING IN INDIA
JIO LAUNCHES FREE AI CLASSROOM COURSE TO PROMOTE DIGITAL LEARNING IN INDIA
Published On

जिओने भारतातील डिजिटल शिक्षणाला नवी दिशा देण्यासाठी आपला नवीन ऑनलाइन कार्यक्रम ‘एआय क्लासरूम’(AI Classroom) सुरू केला आहे. हा चार आठवड्यांचा मोफत कोर्स आहे. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची(AI) बेसिक माहिती आणि त्याचे व्यावहारिक उपयोग शिकवण्यासाठी खास डिझाइन करण्यात आला आहे.

कंपनीने इंडिया मोबाइल काँग्रेस २०२५ (आयएमसी 2025) दरम्यान या उपक्रमाची घोषणा केली. जिओचे म्हणणे आहे की हा कार्यक्रम जिओपीसी आणि जिओ इन्स्टिट्यूट यांच्या भागीदारीत राबवण्यात आला आहे. ज्यामुळे देशभरातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत एआय शिक्षण पोहोचवता येईल.

JIO LAUNCHES FREE AI CLASSROOM COURSE TO PROMOTE DIGITAL LEARNING IN INDIA
Jio Annual Plan : जिओचा भन्नाट वार्षिक प्लॅन! एकदाच रिचार्ज करा अन् मिळवा ९१२.५ GB डेटा अन् बरेच काही...

एआय क्लासरूम कोर्स कुठे रजिस्टर कराल?

हा कोर्स [www.jio.com/ai-classroom](https://www.jio.com/ai-classroom) या वेबसाइटवर उपलब्ध आहे. तो वैयक्तिक कॉम्प्यूटर, डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर सहजपणे पूर्ण करता येतो. मात्र, सध्या हा मोबाईल यूजर्ससाठी उपलब्ध नाही. जिओने सांगितले की जिओपीसी वापरून कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिओ इन्स्टिट्यूटतर्फे अधिकृत प्रमाणपत्र दिले जाईल. तर इतर सहभागींना पूर्णत्वाचा बॅज प्रदान केला जाईल.

JIO LAUNCHES FREE AI CLASSROOM COURSE TO PROMOTE DIGITAL LEARNING IN INDIA
Jio And Airtel: ₹५०० पेक्षा कमीत रिचार्ज प्लॅन; Jio की Airtel, कोण देतेय जास्त फायदा? वाचा सविस्तर

लेक्चरमध्ये काय शिकवले जाईल?

या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना विविध एआय टूल्ससह काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यांना एआयची बेसिक समज, प्रकल्पांचे नियोजन, डिझाइन, कथा आणि सादरीकरण तयार करण्याची कौशल्ये शिकवली जातील. याशिवाय, वास्तविक समस्या सोडवण्यासाठी एआयचा उपयोग कसा करता येतो याबाबतही प्रशिक्षण दिले जाईल.

JIO LAUNCHES FREE AI CLASSROOM COURSE TO PROMOTE DIGITAL LEARNING IN INDIA
Festive Offer: सणासुदीला मोठा डिस्काउंट! Samsung Galaxy S24 5G मोबाईलवर ₹३५,००० रुपयांची सूट, पाहा नेमकी किंमत किती?

वेळ आणि तारीख काय?

रिलायन्स जिओच्या ‘एआय क्लासरूम’ कार्यक्रमाचे लेक्चर स्लॉट ११ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. कंपनीच्या वेबसाइटनुसार, लेक्चरचे वेळापत्रक सकाळी ०९ वाजता, दुपारी १२ वाजता, दुपारी ४ वाजता, संध्याकाळी ०६ वाजता आणि रात्री ०९ वाजता असे असेल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांना वेबसाइटला भेट देता येईल.

या विषयांवर आठवड्याचे वर्ग आयोजित केले जातील

पहिला आठवडा: या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना एआयची बेसिक्स माहिती तसेच प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचे माहिती आणि वापर शिकवले जाणार आहेत.

दुसरा आठवडा: या कोर्सद्वारे विद्यार्थ्यांना क्रिएटिव्हिटीसाठी एआयचा वापर कसा करावा हे शिकवले जाणार आहे.

तिसरा आठवडा: या प्रशिक्षणात बिल्डिंग आणि कम्युनिकेशन क्षेत्रात एआयचा प्रभावी वापर कसा करता येतो हे शिकवले जाणार आहे.

चौथा आठवडा: या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना एआय कॅपस्टोन प्रकल्पाची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि त्याची अंमलबजावणी समजावून सांगितली जाईल.

JIO LAUNCHES FREE AI CLASSROOM COURSE TO PROMOTE DIGITAL LEARNING IN INDIA
Instagram Award Function: इन्स्टाग्राम युजर्सला खुशखबर! टॉप क्रिएटर्सना मिळणार स्पेशल गिफ्ट, वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com