Instagram Award Function: इन्स्टाग्राम युजर्सला खुशखबर! टॉप क्रिएटर्सना मिळणार स्पेशल गिफ्ट, वाचा सविस्तर

Social Media Recognition: इन्स्टाग्रामने त्यांच्या कंटेंट क्रिएटर्ससाठी 'रिंग्ज अवॉर्ड' नावाचा नवीन पुरस्कार कार्यक्रम सुरू केला आहे, ज्यामध्ये त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी वेगवेगळ्या श्रेणीत सन्मानित केले जाईल.
INSTAGRAM RINGS AWARD 2025 TOP CREATORS TO RECEIVE SPECIAL RECOGNITION
INSTAGRAM RINGS AWARD 2025 TOP CREATORS TO RECEIVE SPECIAL RECOGNITION
Published On
Summary
  • इन्स्टाग्रामने पहिल्यांदाच ‘रिंग्ज अवॉर्ड’ नावाचा पुरस्कार सुरू केला आहे.

  • २५ विजेत्यांना ग्रेस वेल्स बोनर यांनी तयार केलेल्या विशेष अंगठ्या दिल्या जातील.

  • विजेत्यांना त्यांचा प्रोफाइल कंटेट सानुकूल करण्याची सुविधा मिळेल.

  • हा पुरस्कार प्रत्येक वर्षी जागतिक स्तरावर दिला जाणार आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामने(Instagram) त्यांच्या यूजर्ससाठी ‘Rings Award’ नावाचा एक खास पुरस्कार कार्यक्रम जाहीर केला आहे. हा पुरस्कार पारंपारिक सेलिब्रिटी पुरस्कार सोहळ्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने साजरा होणार. या उपक्रमात विजेत्यांना एक अद्वितीय बक्षीस फॅशन डिझायनर Grace Wales Bonner यांनी खास डिझाइन केलेल्या अंगठ्या प्रदान करण्यात येतील. या कार्यक्रमाच्या माध्यमातून इन्स्टाग्राम आपल्या प्लॅटफॉर्मवरील उपयुक्त कल्पना, क्रिएटिविटी सन्मान करत असून, यूजर्सना आणखी प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत आहे.

या पुरस्कारासाठी निवडलेले २५ निर्माते कोणत्याही विशिष्ट श्रेणीत नामांकित होणार नाहीत. त्याऐवजी, इन्स्टाग्रामची निवड समिती क्रिएटिविटी आणि वेगळेपणावर आधारित यूजर्सची निवड करेल. इन्स्टाग्रामच्या क्रिएटर प्रोग्राम्स संचालिका इवा चेन म्हणाल्या की निवड प्रक्रिया अत्यंत कठोर होती आणि त्यासाठी ते अशा लोकांचा शोध घेत होते, जे आपल्या कंटेंटद्वारे प्रेक्षकांशी नवे नाते निर्माण करतात आणि सोशल मीडियाला नवे विचार आणि कंटेट प्लॅटफॉर्म म्हणून वापरतात.

INSTAGRAM RINGS AWARD 2025 TOP CREATORS TO RECEIVE SPECIAL RECOGNITION
WhatsApp Update: व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मोठा बदल! टेलिग्रामप्रमाणे युजरनेम फीचर येणार

रिंग्ज अवॉर्ड विजेत्यांना रोख बक्षीस मिळणार नसले तरी त्यांना या पुरस्काराची डिजिटल प्रत दिली जाईल. जी ते आपल्या इन्स्टाग्राम प्रोफाइल व स्टोरीजवर ठेवू शकतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वैयक्तिकरणाची ही सुविधा देण्याची इन्स्टाग्रामची ही पहिलीच वेळ आहे. दोन दशकांपूर्वी मायस्पेस आणि फ्रेंड्सटर यांसारख्या प्लॅटफॉर्मवर अशी वैशिष्ट्ये लोकप्रिय होती.

INSTAGRAM RINGS AWARD 2025 TOP CREATORS TO RECEIVE SPECIAL RECOGNITION
Jio Recharge Plan : ३३६ दिवसांसाठी जिओचा बजेट फ्रेंडली प्लॅन! डेटा, ओटीटी अन् बरेच काही, किंमत फक्त...

या पुरस्काराच्या निवड समितीमध्ये इन्स्टाग्रामचे प्रमुख Adam Mosseri, डिझायनर Grace Wales Bonner, टेक युट्यूबर MKBHD, अभिनेत्री Yara Shahidi, चित्रपट दिग्दर्शक Spike Lee, डिझायनर Marc Jacobs, कलाकार Kaws, मेकअप आयकॉन Pat McGrath, पेस्ट्री शेफ Cedric Grolet, अॅथलीट Ilona Maher, निर्माती Tainy, प्रवास फोटोग्राफर Murad Osmann आणि स्वतः Eva Chen इत्यादी प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे. ही टीम हजारो नामांकनांमधून सर्वोत्कृष्ट २५ निर्मात्यांची निवड करणार आहे.

INSTAGRAM RINGS AWARD 2025 TOP CREATORS TO RECEIVE SPECIAL RECOGNITION
Whatsapp New Feature: फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, कमाल आहे व्हॉट्सअ‍ॅपचं डायलिंग फीचर

इन्स्टाग्राम दरवर्षी हा पुरस्कार कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखते. पहिल्या वर्षीच्या विजेत्यांची घोषणा १६ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. इवा चेन यांनी सांगितले की, लोकांचा प्रतिसाद कसा असतो आणि विजेते जेव्हा इन्स्टाग्रामच्या स्पॉटलाइटमध्ये येतात, किंवा तेव्हा त्यांचा अनुभव काय असतो, हे पाहण्यासाठी आम्हाला खूप उत्सुकता आहे. या अभिनव उपक्रमातून इन्स्टाग्राम केवळ आपल्या निर्मात्यांची कामगिरी बघत नाही, तर प्लॅटफॉर्मला अधिक वैयक्तिक आणि जोरदार क्रिएटिविटीसाठी खुलं करण्याच्या आपल्या प्रयत्नांनाही अधोरेखित करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com