Actress Nandini Kashyap arrested in Guwahati for drunk driving and killing a student in hit-and-run case. Nandini Kashyap
मनोरंजन बातम्या

Actress Arrested : अभिनेत्रीने दारूच्या नशेत २१ वर्षाच्या मुलाला कारने उडवले, जागेवरच मृत्यू

Nandini Kashyap drunk driving accident in Guwahati : दारूच्या नशेत कार चालवत असलेल्या अभिनेत्री नंदिनी कश्यप हिने २१ वर्षीय विद्यार्थ्याला चिरडलं. अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला, पोलिसांनी अटक केली आहे.

Namdeo Kumbhar

  • अभिनेत्री नंदिनी कश्यप दारूच्या नशेत SUV चालवत होती.

  • २१ वर्षीय विद्यार्थ्याचा अपघातात जागीच मृत्यू झाला.

  • CCTV फुटेजच्या आधारे अभिनेत्रीला अटक.

  • विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांकडून न्यायाची मागणी.

Nandini Kashyap Arrested : दारूच्या नशेत अभिनेत्रीने कारने २१ वर्षाच्या विद्यार्थ्याला उडवले. त्यानंतर तिने जागेवरून पळ काढला. मध्यरात्री झालेल्या अपघातामध्ये विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू झाला. गुवाहाटीमध्ये २५ जुलै रोजी झालेल्या अपघातानंतर स्थानिकांचा राग अनावर झाला होता अन् आंदोलन केले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासात अभिनेत्रीचा शोध घेतला. पोलिसांनी आसामची प्रसिद्ध अभिनेत्री नंदिनी कश्यप हिला बेड्या ठोकल्या. (21-year-old polytechnic student death by actress car)

गुवाहाटीमध्ये २५ जुलै रोजी झालेल्या हिट अॅण्ड रण प्रकरणात पोलिसांनी प्रसिद्ध अभिनेत्री नंदिनी कश्यप हिल्या बेड्या ठोकल्या आहेत. नंदीनी कश्यप हिला पोलीस कोर्टात हजर करणार आहेत. त्याआधी तिला कस्टडीमध्ये घेऊन चौकशी करण्यात आली होती. कार चालवताना नंदिनी कश्यप दारूच्या नशेत होती, असे प्राथमिक रिपोर्ट्समधून समोर आले आहे.

अपघातानंतर अभिनेत्री घटनास्थळावरून पसार

अपघाताची ही घटना २५ जुलैच्या रात्री सुमारे ३ वाजता गुवाहाटीतील दक्षिणगांव परिसरात घडली. २१ वर्षीय समीउल हक नावाचा विद्यार्थी रस्ता ओलांडत होता. समीउल नलबाडी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकत होता आणि गुवाहाटी महानगरपालिकेत तात्पुरत्या स्वरूपात कामही करत होता. कामावरून परतताना त्याला भरधाव वेगात येणाऱ्या SUV ने धडक दिली. ही गाडी अभिनेत्री नंदिनी कश्यप चालवत होती, असा दावा काही प्रत्यक्षदर्शी आणि CCTV फुटेजच्या आधारावर करण्यात आला आहे. अपघातानंतर गाडी तात्काळ घटनास्थळावरून पसार झाली.

पोलिसांची तात्काळ कारवाई

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन गुवाहाटी पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. रात्री उशिरा अभिनेत्री नंदिनी कश्यप यांना ताब्यात घेण्यात आले आणि कसून चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर पोलिसांनी नंदिनीला अटक केली. सध्या पोलिस हेही तपासत आहेत की अपघाताच्या वेळी अभिनेत्री नशेच्या अवस्थेत होती का? पोलिस सूत्रांनुसार, नंदिनीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 279 (बेफिकीरपणे वाहन चालवणे) आणि 304A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीय संतप्त

समीउल हक हा पॉलिटेक्निकचा विद्यार्थी होता आणि घर खर्च चालवण्यासाठी तो पार्टटाईम नोकरीही करत होता. मध्यरात्री रस्ता क्रॉस करताना भयंकर अपघात झाला, त्यामध्ये मृत्यू झाला. असम पॉलिटेक्निक विद्यार्थी संघटना आता समीउलसाठी न्यायाची मागणी करत आहे. त्याचबरोबर, समीउलचे कुटुंबीयही आपल्या मुलासाठी न्याय मिळावा यासाठी आग्रह धरत आहेत. पोलिसांनी सांगितले की, त्यांना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले आहे. नंदिनी कश्यप हिच्या दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या दोन्ही गाड्या फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swelling Issues : सकाळी हात पाय सुन्न पडतात? कारणं आणि उपाय जाणून घ्या

Jannat Zubair And Elvish Yadav: फैजलनंतर जन्नत झुबेर करते एल्विश यादवला डेट? 'त्या' फोटोमुळे चर्चेला उधाण

Wardha : वर्ध्यात ३ ते ४ किलोची भलीमोठी गार पडली; तज्ज्ञांच्या तपासणीत धक्कादायक निष्कर्ष

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये भाजप महिला आघाडीचे कांग्रेस विरोधात आंदोलन

Second Hand Iphone : सेंकड हँड आयफोन घेताय? मग 'या' गोष्टी लक्षात ठेवाच

SCROLL FOR NEXT