
रोहित पवारांचा आरोप – कोकाटे यांनी १८ मिनिटे सभागृहात पत्ते खेळले.
चौकशी अहवाल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे सादर.
अजित पवारांनी कोकाटेंना दिली समज, सरकारची बदनामी थांबवा असा इशारा.
सध्या कोकाटेंना राजीनाम्याऐवजी तात्पुरते अभय मिळाल्याची चर्चा.
Rohit Pawar accuses agriculture minister of playing cards during assembly : कृषीमंत्रि माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात आमदार रोहित पवार यांनी आणखी एक डाव टाकलाय. रोहित पवार यांनी थेट विधिमंडळाच्या चौकशीच्या अहवालाचा दाखला देत कोकाटे ४२ सेकंद नव्हे तर १८ मिनिटे पत्ते खेळत असल्याचा दावा केला आहे. हा अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडे सादर झालाय, कारवाई होणार का? असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, अधिवेशन संपल्यानंतर रोहित पवार यांनी कोकाटे यांचा एक कार्ड खेळतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. शेतकरी आत्महत्या करत असताना कृषिमंत्रि सभागृहात पत्ते खेळत आहेत, असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. त्यानंतर कोकाटे यांच्य राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. आता कोकाटे यांच्याविरोधात आणखी एक आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी नवीन आरोप काय केला ?
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना महायुती सरकारकडून अभय देण्यात आले आहे. त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. ही बाब स्पष्ट झाल्यानंतर आमदार रोहित पावर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कोकाटे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. पाहूयात रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं कायम म्हटलेय.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अधिवेशनात ऑनलाइन कार्ड खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. विरोधकांकडून कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावर स्पष्टीकरण देताना कोकाटे यांची जीभ घसरली अन् सरकारलाच भिकारी संबोधित केले. त्यानंतर कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने आणखी जोर धरला. अजित पवार यांनी कोकोटे यांना बोलवून समज दिली. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधी अजित पवार यांनी कोकाटे यांना झापलं. तुमच्यामुळे सरकारची बदमानी होतेय. बोलताना जरा भान ठेवा, अशा स्पष्ट शब्दात कोकाटे यांना समज दिली. त्यावर कोकाटे यांनीही यापुढे बोलताना काळजी घेईल,असे अश्वासन अजित पवार यांना दिले आहे. तुर्तास कोकाटे यांना अभय मिळाल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोकाटे यांचं मंत्रिपद बदलले जाऊ शकते, पण सध्या तशी कोणतीही हालचाल दिसत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.