हॉटेल भाग्यश्रीच्या मालकावर 23 जुलैला अपहरण आणि मारहाणीची घटना घडली.
धाराशिव पोलिसांनी जामखेड येथून 5 आरोपींना ताब्यात घेतले.
राजकीय दबावामुळे तपासात वेग आला, रोहित पवार यांचा सहभाग.
स्थानिक नागरिकांमध्ये संताप, सोशल मीडियावर प्रकरणाची मोठी चर्चा.
Hotel Bhagyashree News Update : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण आणि अपहरणाच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. धाराशिव शहर पोलिसांनी जामखेड येथून पाच आरोपींना ताब्यात घेतले. यापैकी चार आरोपींना अटक झाली आहे, तर एका आरोपीवर वैद्यकीय कारणास्तव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण झाल्याची घटना 23 जुलै 2025 रोजी घडली होती. त्यानंतर तुळजापूर आणि संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. (Hotel Bhagyashree owner kidnapped and assaulted in Tuljapur)
आरोपींनी हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे अपहरण करून बंदुकीचा धाक दाखवत जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता, परंतु सुरुवातीला आरोपी अटकेत न आल्याने हॉटेल मालकाने आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर राजकीय स्तरावरून दबाव वाढला. विशेषतः आ. रोहित पवार यांच्यासह इतर नेत्यांनी हस्तक्षेप केल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना जामखेड येथून अटक केली. विशेष म्हणजे, जामखेड हा आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ आहे, ज्यामुळे या कारवाईला राजकीय रंग प्राप्त झाला आहे.
सोशल मीडियावर या प्रकरणाने मोठी चर्चा घडवली होती. हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण आणि अपहरणाच्या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तीव्र केला आहे. धाराशिव शहर पोलीस या प्रकरणात आणखी काही पुरावे आणि माहिती गोळा करत आहेत. या कारवाईमुळे स्थानिकांमध्ये काहीसा दिलासा मिळाला असला, तरी या प्रकरणाचा पूर्ण खुलासा होण्याची प्रतीक्षा आहे.
हॉटेल भाग्यश्री कोणत्या कारणामुळे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे?
हॉटेल भाग्यश्री त्याच्या अनलिमिटेड मटण थाळी आणि “नाद करती काय, यायलाच लागतंय” या अनोख्या टॅगलाइनमुळे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. याशिवाय, हॉटेलचे मालक नागेश मडके यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या जाहिराती आणि उस्मानाबादी शेळीच्या चवदार मटणामुळेही हे हॉटेल चर्चेत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.