Ashok Mama SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ashok Mama: वटपौर्णिमेच्या दिवशी अनिश-भैरवी घेणार सप्तपदी, 'अशोक मा.मा.' मालिकेचा विशेष भाग, पाहा VIDEO

Ashok Mama Serial Update : 'अशोक मा.मा.' मालिकेचा वटपौर्णिमा स्पेशल भाग खूपच रंजक होणार आहे. यात अशोक मामा अनिश आणि भैरवीचे लग्न लावून देणार आहेत.

Shreya Maskar

'अशोक मा.मा.' (Ashok Mama) मालिकेत भैरवीसाठी यंदाची वटपौर्णिमा (Vat Purnima ) खास ठरणार आहे. याचे कारण म्हणजे वटपौर्णिमाला भैरवी सप्तपदी घेणार आहे. अशोक मामांच्या आशीर्वादाने अनिश आणि भैरवी लग्नाच्या (Anish and Bhairavi wedding ) पवित्र बंधनात अडकणार आहेत. त्यामुळे माजगावकर यांच्याकडे आनंदाचे वातावरण आहे. भैरवी आणि अनिशचे लग्न होणार आहे. त्यामुळे अशोक मामा पारंपरिक पोशाखात दिसत आहेत.

अशोक मामांच्या डोळ्यांत आठवणींचे ओझे आणि चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. अशोक मामा भैरवीसाठी आई-वडिलांच्या जागी आहेत. वटपौर्णिमेच्या शुभ दिवशी भैरवीने सप्तपदी घेणं हा एक योगायोग आहे. मामीच्या आठवणींनी भारावलेले मामा, भैरवीला मामीच्या हातातल्या बांगड्या देतात आणि सांगतात "हे तुझ्या संसारासाठी शुभचिन्ह आहे. तू ही वेणू प्रमाणे संसार निभाव." याचवेळी ते भैरवीकडून एक वचन घेताना दिसणार आहेत "साता जन्मांची ही गाठ फक्त सप्तपदीतच नाही, तर मामीच्या आठवणींतूनही घट्ट राहिली पाहिजे." अशोक मामांचा हा क्षण, रसिक प्रेक्षकांना डोळ्यांत अश्रू आणणारा आहे.

अनिश आणि भैरवीचे लग्न म्हणजे केवळ विधी नाही तर कुटुंबाचे प्रेम आणि विश्वास आहे. लग्न मंडपात भैरवी - अनिशची धमाकेदार एन्ट्री होणार आहे. लग्नाच्या लूकमध्ये भैरवी खूपच सुंदर दिसत आहे. त्यांची जोडी चाहत्यांना खूपच आवडते. भैरवीने सुंदर साडी, शेला, नाकात नथ घातली आहे. या पारंपरिक लूकमध्ये तिचे सौंदर्य खुललं आहे.

विवाह विधी पारंपरिक पद्धतीने पार पाडल्या जाणार आहेत. सप्तपदी, होम सर्व काही मालिकेत पाहायला मिळणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला राधा स्वतःशी मनात पुन्हा शपथ घेते "सौभाग्यवती हो...पण सुखाचा संसार? तो काही मी तुला करू देणार नाही.." भविष्यात राधा काय नवीन डाव खेळणार हे पाहणे 'अशोक मा.मा.' मालिकेत महत्त्वाचे ठरणार आहे.

अनिश-भैरवीच्या लग्नाचा वटपौर्णिमा विशेष भाग 15 जून रविवार दुपारी 2 वाजता आणि रात्री 8 वाजता कलर्स मराठीवर पाहता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Ujjawala Yojana: महिलांसाठी आनंदाची बातमी! उज्जवला योजनेत मोफत गॅस सिलिंडरसोबत मिळणार ₹१८३०

Hingoli Crime News: रात्रीच्या वेळी झोपेतून उठवून ऑफिसमध्ये नेलं अन्...; आश्रम शाळेत 11 वर्षाच्या चिमुरडीसोबत अश्लील कृत्य

पुतण्यासोबत संबंध, नंतर जत्रेला नेत नवऱ्याचा काटा काढला, ८ वर्षांच्या मुलाकडून आईचा खरा चेहरा समोर

Accident : हिट अँड रनचा थरार! भरधाव कारने बहिणींना चिरडले; थोरलीचा मृत्यू, धाकटी गंभीर जखमी

CIDCO Lottery 2025: '३५ लाखांचं घरं ७५ लाखाला विकतात', सिडकोबाबत RTI मधून धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT