Shreya Maskar
मराठी दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा आज (4 जून) वाढदिवस आहे.
आज अशोक मामा 78 वर्षांचे झाले आहेत.
अशोक सराफ यांना आता सर्वत्र 'मामा' या नावाने हाक मारली जाते.
अशोक सराफ यांना 'मामा' हाक कधीपासून मारली जाते, याचा किस्सा एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी सांगितला होता.
अशोक सराफ यांना सेटवर सर्व अशोकजी म्हणायचे मात्र कोल्हापूरकडच्या लोकांना ते अवघडल्यासारखे वाटायचे.
कोल्हापूरमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक कॅमेरामनने त्यांच्या मुलीला अशोक सराफ यांची ओळख 'अशोक मामा' अशी करून दिली.
त्यानंतर शेटवर त्यांना सर्वच 'अशोक मामा' या नावाने हाक मारू लागले.
अलिकडेच अशोक मामा यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.