Arijit Singh saam tv
मनोरंजन बातम्या

Arijit Singh : 38 वर्षांचा ग्लोबल स्टार काही मिनिटांत कमावतो 2 कोटी; 400 कोटी पार संपत्ती, गडगंज श्रीमंत असूनही साधेपणाने जगतोय जीवन

Arijit Singh Net Worth : प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने प्लेबॅक सिंगिंग म्हणून रिटायरमेंट घेतली आहे. त्याच्या आवाजाचे जगभरात चाहते आहेत. अरिजीतची एकूण संपत्ती जाणून घेऊयात.

Shreya Maskar

अरिजीत सिंगने प्लेबॅक सिंगिंगमधून रिटायरमेंट घेतली आहे.

अरिजीत सिंगच्या लाइव्ह कॉन्सर्टला चाहत्यांची गर्दी पाहायला मिळते.

अरिजीत सिंग गाण्यासोबतच त्याच्या साधेपणासाठी ओळखला जातो.

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने प्लेबॅक सिंगिंगमधून रिटायरमेंट घेतली आहे. आजवर त्याने आपल्या आवाजाने चाहत्यांना वेड लावले आहे. अरिजीत सिंगची क्रेझ जगभरात पाहायला मिळते. त्याच्या लाइव्ह कॉन्सर्टला चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळते. त्याला फक्त पाहायला आणि त्याचा आवाज ऐकण्यासाठी चाहते लाखो, करोडो रुपये लावतात. अरिजीत सिंग संगीत क्षेत्रातून बक्कळ कमाई केली आहे. अरिजीत सिंग गडगंज श्रीमंत असूनही त्याचे राहणीमान साधे आहे.

अरिजीत सिंग लाइव्ह कॉन्सर्टला देखील साधे कपडे, पायात चप्पल घालून जाताना दिसतो. ट्रेनमधून प्रवास करताना दिसतो. अरिजीत सिंगने केवळ हिंदीमध्येच नाही तर इतर अनेक भारतीय भाषांमध्येही गाणी गायली आहेत. परंतु प्रामुख्याने त्याने हिंदी आणि बंगालीमध्ये गाणी रेकॉर्ड केली आहेत. तो त्याच्या विविध संगीत प्रकारांसाठी ओळखला जातो.

वर्कफ्रंट

2005 मध्ये 'फेम गुरुकुल' या रिॲलिटी शोमध्ये सहभागी होऊन अरिजीत सिंगने त्याच्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. 2011 मध्ये 'मर्डर 2' या चित्रपटासाठी मिथुन यांनी संगीतबद्ध केलेल्या 'फिर मोहब्बत' या गाण्याने अरिजीतने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांने 'एजंट विनोद'मधील 'राबता', '1920: एव्हिल रिटर्न्स'मधील 'उसका ही बनाना' आणि 'शांघाय'मधील 'दुआ' अशी लोकप्रिय गाणी गायली. त्यानंतर अरिजीत सिंगने कधी मागे वळून पाहिले नाही. त्याने एका मागोमाग एक सुपरहिट गाणी दिली.

नेटवर्थ किती?

मीडिया रिपोर्टनुसार, अरिजित सिंग एका गाण्यासाठी 1-2 कोटी रुपये घेतो. अरिजित सिंग हा भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांपैकी एक आहे. मोठ्या लाइव्ह कॉन्सर्टसाठी अरिजित जवळपास 14 कोटी रुपये मानधन घेतो. अरिजित सिंगची एकूण संपत्ती 400 कोटी रुपयांच्यावर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अरिजित सिंग 414 कोटी रुपयांचा मालक आहे. लाइव्ह शोज, मैफिली, ब्रँड एंडोर्समेंट यातून तो पैसे कमावतो. त्याचे वार्षिक कमाई सुमारे 70 कोटी रुपये आहे. त्याचे मुंबईत आलिशान घर आहे. ज्याची किंमत जवळपास 8 कोटी रुपये आहे. त्याच्याकडे रेंज रोव्हर आणि मर्सिडीज या लग्जरी कार आहे. ज्यांची किंमत कोटींच्या घरात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीस यांची आज रायगडच्या पेणमध्ये सभा

धक्कादायक! भंडाऱ्यात बायकोनं नवऱ्यावर केला चाकूने वार, कारण वाचून तुम्हीही चक्रावून जाल; त्या रात्री काय घडलं?

Shivsena: शिवसेना कुणाची ZP च्या निकालनंतर होणार फैसला, नवी तारीख आली समोर

Bank Holidays: २८ दिवसांचा महिना, ९ दिवस बँका बंद; फेब्रुवारीतील सुट्ट्यांची यादी वाचा

Todays Horoscope: अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येणार, पैसाही मिळणार; 'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस ठरणार लकी

SCROLL FOR NEXT