Arijit Singh Retirement : अरिजीत सिंगनं गाणं सोडलं नाही, रिटायरमेंटनंतरही आपल्या मधुर आवाजाने चाहत्यांना लावणार याड

Arijit Singh Retires From Playback Singing : प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने प्लेबॅक सिंगिंग म्हणून रिटायरमेंट घेतली आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पण रिटायरमेंटनंतरही अरिजीत सिंग गाताना दिसणार आहे.
Arijit Singh Retires From Playback Singing
Arijit Singh Retirementsaam tv
Published On
Summary

अरिजीत सिंगने प्लेबॅक सिंगिंगमधून रिटायरमेंट घेतली आहे.

अरिजीत सिंगच्या रिटायरमेंटच्या घोषणेनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

रिटायरमेंटनंतरही अरिजीत सिंगचा मधुर आवाजाने चाहत्यांना ऐकू येणार आहे.

कालपासून सर्वत्र फक्त अरिजीत सिंगची चर्चा पाहायला मिळत आहे. अरिजीत सिंगच्या एका निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 27 जानेवारी 2026 ला रात्री अरिजीत सिंगने एक पोस्ट केली. ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. त्याने प्लेबॅक सिंगिंगमधून रिटायरमेंट घेतली आहे. ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली, ज्यामुळे त्यांचे चाहते निराश झाले. चाहत्यांना असे वाटू लागले की, ते अरिजीतची गाणी आता ऐकणार नाहीत. पण तसे नाही. अरिजीत सिंग रिटायरमेंटनंतरही गाणे गाणार आहे. चाहत्यांना अरिजीतचा आवाज ऐकू येणार आहे.

अरिजीत सिंगने पार्श्वगायन सोडले आहे, गाणे सोडले नाही. प्लेबॅक सिंगिंग किंवा पार्श्वगायन म्हणजे चित्रपटांसाठी गाणी गाणे होय. चित्रपटात आपल्याला दिसते की, नायक आणि नायिका पडद्यावर गाणे गातात. मात्र खरंतर ही गाणी गायक आणि गायिका आधीच वेगळ्या स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करतात. ते कॅमेऱ्यासमोर येत नाहीत, फक्त त्यांचा आवाज ऐकू येतो. थोडक्यात, चित्रपटांसाठी गाणे म्हणजे पार्श्वगायन. त्यामुळे अरिजीत सिंग स्वतंत्रपणे गाणे सुरू ठेवणार आहे.

अरिजीत सिंगच्या रिटायरमेंटचा नेमका अर्थ काय?

अरिजीत सिंगने पोस्टमध्ये म्हटल्यानुसार, त्याने फक्त प्लेबॅक सिंगिंगमधून रिटायरमेंट घेतली आहे. त्याने अद्याप गायन किंवा संगीत सोडलेले नाही. त्याने गाणे सोडलेले नाही. तो फक्त यापुढे पार्श्वगायक म्हणून काम करणार नाही. याचा अर्थ तो आता चित्रपटांसाठी गाणार नाही. तो चित्रपटांव्यतिरिक्त गाणी गाताना, संगीत क्षेत्रात काम करताना दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांना अरिजीत सिंगचा आवाज कायम ऐकता येणार.

प्लेबॅक सिंगिंग नाही तर 'या' माध्यमातून अरिजीत सिंग येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अरिजीत सिंगने चित्रपटात गाणी गाण्याव्यतिरिक्त संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख बनवली आहे. त्यामुळे त्याची संगीतातील बाकी सर्व काम सुरू राहतील. फक्त एकच बदल म्हणजे तो चित्रपटांसाठी गाणार नाही. तो स्वतंत्रपणे गाऊ शकतो, स्वतःचे अल्बम आणि संगीत व्हिडिओ तयार करू शकतो आणि YouTube वर त्याची गाणी रिलीज करू शकतो. तो लाइव्ह कॉन्सर्ट आणि स्टेज शोमध्ये सादरीकरण करत राहील. तो संगीत तयार करू शकतो. त्यामुळे लक्षात घ्या, अरिजीतने गाणे सोडलेले नाही, त्याने फक्त चित्रपटांसाठी गाणे गायचे सोडले आहे.

Arijit Singh Retires From Playback Singing
Tharala Tar Mag : अर्जुन-सायलीसमोर येणार 22 वर्षांपूर्वीच्या अपघाताचं सत्य; नागराजचा खेळ संपला, सुमन करणार नवऱ्याचा पर्दाफाश| VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com