Singer Shan: पार्श्वगायक शान यांना ‘आशा भोसले’ पुरस्कार जाहीर

Playback Singer Shan : शान यांनी आजवर केलेल्या संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन शान यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. एक लाख अकरा हजार रुपये रोख, शाल व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
Playback Singer Shan
Playback Singer Shan Google
Published On

(गोपाल मोटघरे, पुणे)

Pimpri Chinchwad Akhil Bharatiya Marathi Natya Parishad :

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने आणि पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठानच्या सहयोगाने यंदाचा 'आशा भोसले पुरस्कार' चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध पार्श्वगायक, संगीतकार शांतनू मुखर्जी (शान) यांना देण्यात येणार आहे. (Latest News)

नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या २४ वर्षांपासून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. ११ फेब्रुवारी सायंकाळी ५:३० वाजता, कामगार कल्याण मैदान, भोईर नगर, चिंचवड येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. देश पातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकारांना आशाजींच्या वाढदिवशी म्हणजे ८ सप्टेंबरला हा पुरस्कार जाहीर केला जातो.

  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यापूर्वी गानकोकिळा लता मंगेशकर, खय्याम, रवींद्र जैन, बप्पी लाहिरी, प्यारेलालजी, आनंदजी, पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अन्नू मलिक, शंकर महादेवन, पं. शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरि हरन, सोनू निगम, सुनिधी चौहान, पद्मभूषण उदित नारायण, रूपकुमार राठोड, अवधूत गुप्ते, सलील कुलकर्णी अशा दिग्गज संगीतकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शान यांनी आजवर केलेल्या संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन शान यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. एक लाख अकरा हजार रुपये रोख, शाल व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

Playback Singer Shan
Ramayana Movie: 'रामायण'ची तयारी पूर्ण; मुंबई आणि लंडनमध्ये 'या' महिन्यापासून सुरू होणार शुटिंग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com