Famous Singer Death: इंडियन आयडल फेम गायकाचे ४३ व्या वर्षी निधन; संगीत विश्वावर शोककळा

Famous Singer Death: 'इंडियन आयडल ३' या रिअॅलिटी शोचे विजेते प्रशांत तमांग यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जवळच्या मित्राने त्यांच्या निधनाची माहिती दिली.
Indian Idol Season 3 Winner singer Prashant Tamang Passed Away
Indian Idol Season 3 Winner singer Prashant Tamang Passed AwaySaam Tv
Published On

Singer Death: गायक आणि अभिनेता प्रशांत तमांग यांचे वयाच्या ४३ व्या वर्षी निधन झाले. चित्रपट निर्माते राजेश घटानी यांनी तमांग यांच्या निधनाची माहिती दिली आहे. दार्जिलिंगचे गायक महेश सेवा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रशांत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.

प्रशांत तमांग यांचे निधन कसे झाले?

गायक महेश सेवा यांनी सांगितले की प्रशांत तमांग यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी ते दिल्लीत राहत होते. महेश सेवा यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये प्रशांत तमांग यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, "माझ्या प्रिय भावाच्या प्रशांतच्या निधनामुळे मी माझे दुःख व्यक्त करतो."

Indian Idol Season 3 Winner singer Prashant Tamang Passed Away
Krantijyoti Vidyalay: साऊथ-हिंदी चित्रपटांना मागे टाकत 'क्रांतिज्योती विद्यालय'ची घोडदौड; सकाळी ७ ते रात्री १२चे सगळे शो हाऊसफुल

पोलिस अधिकारी ते गायक

प्रशांत तमांग 'इंडियन आयडल ३' चे विजेते होते. या रिअॅलिटी शोमध्ये येण्यापूर्वी ते कोलकाता पोलिसात काम करत होता. ते पोलिस ऑर्केस्ट्राचा देखील भाग होता आणि अनेक वेळा त्यांनी पोलिस कार्यक्रमांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना इंडियन आयडलमध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला होता. इंडियन आयडल जिंकल्यानंतर, प्रशांतने सोनी बीएमजी सोबत त्याचा पहिला अल्बम रिलीज केला. यामध्ये त्यांनी हिंदी आणि नेपाळी गाणी गायल्या. नंतर, प्रशांतने नेपाळी चित्रपटांमध्ये गायक आणि अभिनेता म्हणूनही काम केले.

Indian Idol Season 3 Winner singer Prashant Tamang Passed Away
Kriti Sanon Sister: नुपूर आणि स्टेबिन अडकले विवाहबंधनात; बहिणीच्या लग्नात क्रिती सॅननला अश्रू अनावर

'पाताल लोक २' या मालिकेतील लोकप्रिय भूमिका

प्रशांत तमांग यांनी केवळ नेपाळी चित्रपटांमध्ये गायक आणि अभिनेता म्हणून काम केले नाही तर जयदीप अहलावत अभिनीत 'पाताल लोक २' या मालिकेतही काम केले आहे. या मालिकेत त्याने खलनायक डॅनियल लेचोची भूमिका साकारली होती. या सिरीजमधील त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात त्यांची वेगळी भूमिका तयार झाली होती. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वाने एक उत्तम गायक आणि अभिनेता गमावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com