Ankita-Vicky SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ankita-Vicky : विकीनं पकडला दुसऱ्या अभिनेत्रीचा हात; रागाने लालबुंद झाली अंकिता, पाहा VIDEO

Ankita-Vicky Video : सध्या सोशल मीडियावर अंकिता आणि विकीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अंकिता विकीवर रागवताना दिसत आहे.

Shreya Maskar

टिव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अंकिता आणि तिचा नवरा विकी जैन (Vicky Jain)टिव्ही इंडस्ट्रतील पावर कपल आहे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन एकत्र 'बिग बॉस 17'मध्ये सहभाग घेतला होता. तेव्हापासून यांच्या रिलेशनशिपची कायम चर्चा पाहायला मिळाली. 'बिग बॉस 'च्या घरात विकी आणि अंकितामध्ये भरपूर भांडणे झाली. आता मात्र ही जोडी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर विकी जैनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

विकी जैनच्या व्हायरल व्हिडीओमध्ये तो एक अभिनेत्रीचा हात पकडून खूप वेळ बोलताना पाहायला मिळत आहे. तेव्हा अंकिताने दिलेली रिॲक्शन कॅमेरात कैद करण्यात आली आहे. नुकतात 'फौजी 2' एका इव्हेंट पार पडला. या कार्यक्रमाला अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी उपस्थिती लावली होती. तेव्हा विकी जैनने मीरा चोप्राचा हात पकडला होता. तिचा हात पकडून तो खूप वेळ तिच्याशी बोलत होता. लांब उभी राहिलेली अंकिता लोखंडे हे सर्व पाहत होती.

मीरा चोप्राशी बोलून झाल्यावर विकी जैन अंकिताच्या बाजूला जातो. तेव्हा इशारा करत अंकिता त्याला "काय झाले" असे विचारते. तेव्हा विकी अंकिताच्या कानात काय तरी बोलतो. मात्र त्यानंतर अंकिता रागाने मीराकडे पाहत असताना दिसते आणि परत विकीला ही काही तरी बोलते. एकंदर विकी जैन आणि मीराच्या बोलण्याचा अंकिता लोखंडेला राग आल्याचे दिसून येत आहे.

विकी जैन आणि अंकिता लोखंडेच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तसेच त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'फौजी 2' च्या इव्हेंटला मनोज वाजपेयी, गौहर खान, जैद दरबारदेखील पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आक्रमक आंदोलन; ग्रेस मार्क आणि परीक्षा पॅटर्नवरून गोंधळ

Fact Check: 500 रुपयाच्या नोटा बंद होणार? एटीएममध्ये नोटा न टाकण्याचे बँकांना आदेश? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ravindra Jadeja : एकटा नडला, इंग्लंडला घाम फोडला; भारताचा पराभव झाला, पण रवींद्र जडेजा लक्षात राहीला

IND vs ENG 3rd Test: लय भारी! शानदार रवींद्र जडेजा; बनवला ७२ वर्षांत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम

Maharashtra Politics: शिंदे की ठाकरे, धनुष्यबाण कुणाचा? पालिका निवडणुकीत कुणाचं टेन्शन वाढणार?

SCROLL FOR NEXT