Yavatmal Crime : जुन्या वादाचा राग डोक्यात, एकट्याला मध्यरात्री गाठलं, तलवार अन् रॉडने तरुणाला संपवलं

Yavatmal Murder of a Young Man : यवतमाळच्या उमरखेड शहरातील दोन गटात तुफान राडा झाला आहे. जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आला असून यात एका २३ वर्षीय तरुणाची चाकू, तलवार आणि रॉडचे घाव घालून निर्घुण हत्या करण्यात आली.
umarkhed youth murder
umarkhed youth murderSaam Tv News
Published On

संजय राठोड, साम टिव्ही

यवतमाळ : यवतमाळच्या उमरखेड शहरातील दोन गटात तुफान राडा झाला आहे. जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आला असून यात एका २३ वर्षीय तरुणाची चाकू, तलवार आणि रॉडचे घाव घालून निर्घुण हत्या करण्यात आली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले. ही खळबळजनक घटना उमरखेडच्या आठवडी बाजार परिसरात मध्यरात्री दरम्यान घडली. यामुळे शहरात एकाच खळबळ उडाली.

शेख अजहर शेख अकबर असं मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी मृत तरुणाचा मोठा भाऊ शेख खालीद शेख अकबर याने उमरखेड पोलिसांत तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतलं आहे. जुन्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

umarkhed youth murder
Mumbai Local Train Accident: हात निसटला, तो कायमचाच! शहाडमधील तरुणाचा लोकल अपघातात मृत्यू, आईचा काळीज पिळवटून टाकणारा टाहो

पुण्यात निवासी डॉक्टराने उचललं टोकाचं पाऊल

सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी १८ एप्रिल रोजी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर आणखी एका प्रकरणामुळे पुणे हादरलं आहे. निवासी डॉक्टरने खोलीतच आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्याने गळफास घेऊन आयुष्याचा दोर कापला असून, रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

श्याम व्होरा (वय २८) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. हा युवा डॉक्टर पुणे शहरातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होता. रविवारी त्याने राहत असलेल्या डॉक्टर हॉस्टेलमध्ये गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. रविवारी (८ जून) रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, श्याम बराच वेळ खोलीत होता. कुणीही दरवाजा उघडत नसल्यामुळे सुरक्षा रक्षकाला संशय आला. त्यामुळे त्याने दरवाजा तोडला. त्यावेळी श्याम व्होरा हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनी खोलीची झडती घेतली. पोलिसांना घटनास्थळी मोबाईलचा पासवर्ड लिहिलेली एक चिठ्ठी सापडली असून, चिठ्ठीच्या आधारे तपास सुरू आहे.

umarkhed youth murder
Maratha Community : 'डीजे, हुंडा बंदी, प्री-वेडिंग शूट नाही अन्...'; मराठा समाजाने लग्नासाठी ठरवली आचारसंहिता, वाचा संपूर्ण नियम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com