Ananya Pandey canva
मनोरंजन बातम्या

Ananya Pandey: तू कुणाला डेट करतेय? रिपोर्टरच्या प्रश्नावर अनन्या पांडे हिनं काय दिलं उत्तर?

Ananya Pandey About Relationship: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे नेहमी तिच्या हटके लूक्समुळे चर्चेत असते. अनन्याने तिच्या रिलेशनशिपबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांशी शेअर केल्या आहेत.

Saam Tv

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचा नुक्ताच ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर 'कॉल मी बे' ही वेबसीरिज काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाली आहे. या वेब सीरिजमध्ये अनन्याने उत्तम अभिनय केला आहे. प्रेक्षक तिच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. नुकताच एका कार्यक्रमात अनन्याने हाजेरी लावली होती. त्यादरम्यान अभिनेत्रीने महिला सुरक्षा, डेटींग अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर तिने तिचे मत मांडले.

अनन्याने सांगितले की, अनेक प्रोडक्शन हाऊसने महिलांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली आहेत आणि तिथे काम करणाऱ्या महिलांसाठी हेल्पलाइन नंबर उपलब्ध करून दिली आहे. या नंबरवर कॉल करुन तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. त्यासोबतच काही दिवसांपूर्वी अनन्याचे नाव अदित्य रॉय कपूरसोबत जोडलं गेले होते.मात्र आता या चर्चांना अनन्याने पूर्णविराम लावला आहे. अनन्या आदित्यला डेट करतेय की नाही हे तिने चाहत्यांना थेट सांगत सर्व विषय बंद केलाय.

मुलाखाती दरम्यान अनन्याला "तू अदित्यला डेट करत आहेस का?" असं विचारण्यात आलं होतं. त्यावर अभिनेत्री म्हणाली की,"मला माझ्या रिलेशलशिप किंवा प्रेम प्रायव्हेट ठेवायला आवडेल. मी सध्या कोणत्याही डेटींग ॲपवरही नाहीये. कारण मला एखाद्याला भेटल्यावरचं त्याच्यावर प्रेम होऊ शकतं. मला एक हेल्दी रिलेशनशिप हवी आहे." त्यानंतर पापराझींनी अभिनेत्रीला तुझा भविष्यात जर कधी ब्रेकअप झाला तर त्याचं कारण काय असू शकतं? त्यावर अभिनेत्री म्हणाली की, "मला माझा सेल्फ रिस्पेक्ट महत्त्वाचा आहे. जर कोणी माझा अपमान किंवा फसवणूक केली तर मला अशा नात्यामध्ये राहायला आवडणार नाही."

अनन्याच्या या कारणांमुळे तिचं आणि आदित्यचं ब्रेकअप तर झालं नाही ना असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सध्या अनन्या तिच्या 'कॉल मी बे' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. त्यासोबतच अनन्या तिच्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.अनन्या तिच्या चाहत्यांशी इन्स्टाग्रामद्वारे संवाद साधत असते. अनन्याने विक्की कौशल आणि त्रिप्ती डिमरीच्या 'बॅड न्यूज' या चित्रपटामध्ये कॅमिओ केले आहे. तिच्या चित्रटातील अभिनयाचं प्रेक्षकांनी भरभरुन कौतुक केले आहे.

Edited By: Nirmiti Rasal.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT