Anant Ambani-Radhika Merchant Wedding Festivities Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anant-Radhika Wedding : अनंत- राधिकाच्या लग्नात हॉलिवूड स्टार्स करणार परफॉर्म, कोण-कोण राहणार उपस्थित पाहा लिस्ट

Anant Ambani-Radhika Merchant Wedding Festivities : अनंत- राधिका यांच्या लग्नाला बॉलीवूड स्टार्ससोबतच क्रीडा आणि बिझनेस क्षेत्रातील दिग्गजही हजेरी लावणार आहेत. मिडिया रिपोर्टनुसार लग्नाला अनेक हॉलिवूड पॉप सिंगर परफॉर्म करणार आहेत.

Chetan Bodke

देशातच नव्हे तर जगभरात सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होतेय. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. अनंत- राधिका यांच्या दोन्हीही प्री- वेडिंगला फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही तर, अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींनीही उपस्थिती लावली होती. प्री- वेडिंगला रिहाना आणि वाका वाका फेम शकिराने विशेष उपस्थिती लावली होती. यासाठी दोघींनीही घसघशीत मानधनही स्विकारलं होतं. येत्या १२ जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शानदार विवाहसोहळा पार पडणार आहे. आता लग्नासाठीही काही हॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थिती लावणार आहेत.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न येत्या १२ जुलै रोजी मुंबईच्या बीकेसीमधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, लग्नासाठी हॉलिवूड पॉप सिंगर जस्टिन बीबर उपस्थिती लावणार आहे. जस्टिन खास लग्नासाठी गुरूवारीच भारतात आला आहे. पॉप सिंगर जस्टिन बीबर लग्नासोबतच संगीतसाठीही उपस्थिती लावणार आहे. जस्टिन संगीत सोहळ्यामध्ये परफॉर्मन्सही सादर करणार आहे. अनंत- राधिका यांच्या लग्नाच्या आधीच्या विधींना ३ जुलैपासूनच सुरूवात झालेली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ५ जुलैला अँटिलीया हाऊसमध्येच हा संगीत सोहळा पार पडणार आहे.

जस्टिन गुरूवारी सकाळी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला. अनंत- राधिकाच्या लग्नानिमित्त जस्टिन भारतात ७ वर्षांनी आला आहे. यापूर्वी तो २०२२ मध्ये भारतात येणार होता. पण त्याची तेव्हा तब्येत व्यवस्थित नव्हती, म्हणून त्याने तो दौरा रद्द केला. मीडिया रिपोर्टनुसार, प्रसिद्ध रॅपर आणि गायक ड्रेक हा अनंत आणि राधिकाच्या लग्नात परफॉर्म करणार आहेत. त्यासोबतच एडेल आणि लाना डेल रे ही लग्नाला उपस्थित राहणार आहे. यातील काही अद्याप हॉलिवूड सेलिब्रिटी भारतात आलेले नाही. ते लवकरच भारतात येणार आहेत. मिडिया रिपोर्टनुसार, अंबानी कुटुंबाची व्यवस्थापन टीम आणखी काही आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबतही चर्चा करत आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्य विवाहसोहळा १२ ते १४ जुलै दरम्यान पार पडणार आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत- राधिका विवाहबंधनात अडकणार आहेत. या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटीसोबतच क्रीडा तसेच बिझनेस क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत. या भव्य लग्नाचे कार्ड आधीच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. १२ जुलैला भव्य दिव्य लग्न, १३ जुलैला शुभ आशीर्वाद सोहळा तर १४ जुलैला ग्रँड वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT