Amruta Khanvilkar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Amruta Khanvilkar : "खोटी माहिती शेअर केली तर..."; घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांना अमृता खानविलकरने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

Amruta Khanvilkar Take Legal Action : मराठी प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अफवा पसरवणाऱ्यांवर चांगलीच भडकली आहे. तिने कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. अभिनेत्री नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

घटस्फोटाच्या अफवांवर अमृता खानविलकर संतापली

अमृता खानविलकरने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

अभिनेत्रीने सोशल मीडियावर केली पोस्ट

लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर गेल्याकाही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. सोशल मीडियावर अमृता खानविलकरच्या घटस्फोटाच्या अफवा पसरवल्या जात आहेत. अमृता खानविलकर आणि तिचा नवरा हिमांशु मल्होत्रा यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहेत. यावर आता अखेर अमृता खानविलकरने मौन सोडले असून बदनामी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा तिने दिला आहे. अभिनेत्रीने त्यासंबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अमृता खानविलकरची पोस्ट

"अधिकृत कायदेशीर निवेदन १० ऑगस्ट २०२६ पासून लागू

अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्याबाबत ऑनलाइन व सोशल मीडिया माध्यनांवर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असत्य, निराधार, बदनामीकारक किंवा गोपनीयताचा भंग करणारा मजकूर प्रसारित केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करून बदनामी, अफवा किंवा खोटी माहिती प्रसारित केल्यास किंवा शेअर केल्यास, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संबंधित व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

कायदेशीर टीम - अमृता खानविलकर"

अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्रा गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या सर्व अफवांना फेटाळून लावणारे एक कठोर कायदेशीर निवेदन या जोडप्याने जारी केले आहे. सोशल मीडियावर अमृता खानविलकरने घेतलेल्या या ठाम भूमिकेचे कौतुक केले जात आहे. तसेच तिला चाहते आणि कलाकार मंडळींकडून पाठिंबा मिळत आहे.

अमृता आणि हिमांशु यांनी 2015 साली लग्नगाठ बांधली. अमृता आणि हिमांशु 'नच बलिये ७' चे विजेते ठरले होते. अमृता ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. 'अर्जुन', 'साडे माडे तीन', 'आयना का बायना', 'चंद्रमुखी' आणि 'बाजी' यांसारख्या चित्रपटांतून तिने काम केले आहे. तसेच तिने 'फूँक', 'हिम्मतवाला' आणि 'राझी' यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर, हिमांशुने 'भागोनवाली - बांटें अपनी तकदीर', 'लव्ह मॅरेज या अरेंज्ड मॅरेज' आणि 'चिकू की मम्मी दूर केई' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. 'वजह तुम हो', 'शेरशाह' आणि 'केसरी वीर' या चित्रपटातही तो झळकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावरील दरोडाच्या सूत्रधार बीडमधून जेरबंद

Heart failure symptoms: हार्ट फेल्युअर होण्याच्या काही तासांपूर्वी दिसतात हे 5 बदल, तिसरं लक्षण दिसताच डॉक्टरकडे धावा

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोनं झालं स्वस्त, 10 तोळा सोन्यात 14,700 रुपयांची घसरण; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

भीषण अपघात! मिनीबस अन् ट्रकची जोरदार धडक; ५ जणांचा जागीच मृत्यू, ७ जण मृत्यूशी देतायत झुंज

LPG Price September : 1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांसाठी मोठे बदल! सिलेंडरच्या दरांपासून e-KYC पर्यंत जाणून घ्या अपडेट्स

SCROLL FOR NEXT