Amitabh Bachchan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan : ऐश्वर्याचा अपघात, अंबानींकडून मोठी मदत, अमिताभ बच्चन 2 दिवस झोपले नव्हते

Shreya Maskar

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या अभिनयाचे प्रेक्षक दिवाने आहेत. तसेच बिग बींची सून अभिनेत्री ऐश्वर्या रायचेही प्रचंड चाहते आहेत. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने ती नेहमीचं प्रेक्षकांना घायाळ करत असते.

अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. 'मोहब्बतें' आणि 'खाकी'हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. सध्या 'खाकी' चित्रपटाचा एक किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'खाकी' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ऐश्वर्या रायला दुखापत झाली होती.

अमिताभ बच्चन यांनी एका मुलाखतीत ऐश्वर्यासोबतचा किस्सा सांगितला आहे. नाशिकमध्ये 'खाकी' चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना ऐश्वर्या रायचा अपघात होतो. ऐश्वर्या आणि तुषार एका सीनमध्ये कार चालवत असतात. मात्र कारच नियंत्रण सुटल्यामुळे त्यांचा मोठा अपघात होतो. हा अपघात स्टंटमनच्या चुकीमुळे होतो. त्या दोघांनाही त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात येते. या अपघात ऐश्वर्या रायला खूप दुखापत झाली. ऐश्वर्या रायच्या पाठीवर कॅक्टसचे काटे लागले होते. त्यामुळे शरीरावर अनेक कट पडले होते. तसेच या अपघातात तिच्या पायाचे हाडही तुटले. ऐश्वर्या रायची अशी स्थिती पाहून अमिताभ बच्चन यांना दोन रात्री झोप लागली नाही. घडलेला प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोरून जात नव्हता.

दुखापतीनंतर ऐश्वर्या रायला मुंबईत घेऊन आले. अनिल अंबानीच्या खाजगी जेटसोबत बीग बींनी संपर्क साधला. मात्र रात्री नाशिकमध्ये जेट लँड करता आले नाही. यामुळे हॉस्पिटलपासून 45 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या लष्करी तळावर हे जेट लँड करण्यात आले. दिल्लीहून सर्व परवानगी घेऊन तिला ताबडतोब मुंबईला हलवण्यात आले.

अलीकडे ऐश्वर्या आणि अभिषेक विभक्त होण्याची चर्चा सोशल मीडियावर चांगली रंगली होती. ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत 2007 साली लग्नगाठ बांधली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : हर्षवर्धन पाटील यांच्या मतदारसंघाचा विषय थोडा अडचणीचा, गिरीश महाजन

Pune Crime : पुण्यात आणखी एक संतापजनक प्रकार; शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत केलं भयंकर कृत्य

Maharashtra Travel : अभेद्द जंजिऱ्यावरील तलावांचाही आहे रंजक इतिहास

Harshvardhan Patil News : शरद पवारांनी डाव टाकलाच! हर्षवर्धन पाटील 'तुतारी' हाती घेणार?

Air Pollution : हिवाळ्यातच हवा प्रदूषणाचा धोका का वाढतो?; हवेची PM पातळी म्हणजे नक्की काय? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT